जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पैशांसाठी काय पण! 24 कोटींच्या इन्शुरन्ससाठी ट्रेनखाली आला, हात-पायही तोडले; पण झालं काहीतरी भलतच

पैशांसाठी काय पण! 24 कोटींच्या इन्शुरन्ससाठी ट्रेनखाली आला, हात-पायही तोडले; पण झालं काहीतरी भलतच

पैशांसाठी काय पण! 24 कोटींच्या इन्शुरन्ससाठी ट्रेनखाली आला, हात-पायही तोडले; पण झालं काहीतरी भलतच

काही असेही लोक आहेत, जे इन्शुरन्सचा फायदा घेण्यासाठी चुकीच्या मार्गाचा, पद्धतीचा वापर करतात. असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हंगेरी, 11 नोव्हेंबर : अनेक जण आपलं आयुष्य सिक्योर करण्यासाठी लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) करतात. त्यासाठी जीवंत असताना काही रक्कम भरावी लागते. कधी गरज लागल्यास इन्शुरन्स कंपनी प्रत्येकाच्या विम्यानुसार मदत करते. इन्शुरन्स अनेक प्रकारचे असतात. यात हेल्थसह लाइफ इन्शुरन्सही सामिल असतो. पण काही असेही लोक आहेत, जे इन्शुरन्सचा फायदा घेण्यासाठी चुकीच्या मार्गाचा, पद्धतीचा वापर करतात. असाच एक फ्रॉड 2014 मध्ये हंगेरीत झाला आहे. 2014 मध्ये झालेल्या या फ्रॉडचा आता खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये हंगेरीतील Nyircsaszari गावात राहणारे Sandor Cs. यांनी ट्रेन अपघातात आपले हात-पाय गमावले. अपघातानंतर गुडघ्याच्या खाली संपूर्ण पाय गेले. त्यामुळे ते व्हिलचेअरवर आले. त्याशिवाय त्यांना नकली हात-पाय लावण्यात आले. या व्यक्तीने अपघातानंतर इन्शुरन्स कंपनीकडे पैसे मागितले. ज्यावेळी इन्शुरन्स कंपनीने पैसे देण्याआधी तपास केला असता त्यावेळी समोर आलेल्या गोष्टीने सर्वजण हैराण झाले. 9 नोव्हेंबर रोजी डिस्ट्रिक्ट कोर्टाने निर्णय देताना सांगितलं, की संदोर नावाच्या या व्यक्तीने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वत:च अपघात घडवून आणला. त्यांनी स्वत: चालत्या ट्रेनखाली उडी मारल्याचं कंपनीने म्हटलं आहे. त्यांनी 24 कोटींचा इन्शुरन्स केला होता. हे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी आपले हात-पाय स्वत:हून अपघातग्रस्त केले.

गेम खेळत होता लहान मुलगा; इतक्यात जवळ आला महाकाय साप अन्.., धडकी भरवणारा VIDEO

अपघातानंतर त्यांच्या पत्नीने इन्शुरन्स कंपनीकडे पैसे मागितले. परंतु पैसे देण्याआधी कंपनीने केलेल्या तपासात अपघात घडवल्याची बाब समोर आली. पण त्या व्यक्तीने स्वत:हून अपघात घडवल्याची बाब मान्य केली नाही. कित्येक वर्ष कोर्टात हे प्रकरण सुरू राहिलं आणि त्यावर आता कोर्टाने निर्णय देत इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठीच त्यांनी अपघात घडवल्याचा निर्णय दिला. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय कोर्टाला धोका दिल्याबद्दल 4 लाख 71 हजारांचा दंडही झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात