जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune Crime: सुनेवर चाकू हल्ला करत सासऱ्याची आत्महत्या, धक्कादायक घटनेनं खळबळ

Pune Crime: सुनेवर चाकू हल्ला करत सासऱ्याची आत्महत्या, धक्कादायक घटनेनं खळबळ

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

Crime in Pune: ‘माझ्या घरात कशी काय राहते, तेच बघतो’ म्हणत सुनेवर (daughter in law) चाकूनं वार (Knife attack) करणाऱ्या सासऱ्यानं देखील महामार्गावर भरधाव डंपरखाली उडी मारून आत्महत्या (Father in law committed suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

खेड, 19 जून: ‘माझ्या घरात कशी काय राहते, तेच बघतो’ म्हणत सुनेवर चाकूनं वार (knife attack on daughter in law) करणाऱ्या सासऱ्यानं देखील महामार्गावर भरधाव डंपरखाली उडी मारून आत्महत्या (Father in law committed suicide) केल्याची घटना समोर आली आहे. मृत सासऱ्यानं आपल्या सुनेवर चाकूहल्ला केल्यानंतर दुचाकी घेऊन फरार झाला होता. त्यानंतर त्यानं महामार्गावर भरधाव डंपरखाली उडी मारून आपला जीव दिला आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी बेशुद्धावस्थेत पडलेल्या सासऱ्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुरुषोत्तम दगडू येवले (वय-75) असं आत्महत्या केलेल्या सासऱ्याचं नाव आहे. तर राधिका मोरेश्वर येवले (वय-35) असं चाकूहल्ला झालेल्या सुनेचं नाव आहे. दोघंही खेड तालुक्यातील वाकी गावातील संतोषनगर परिसरात राहतात. किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीनंतर सासरे पुरुषोत्तम यांनी रागाच्या भरात आपल्या सुनेवर चाकूहल्ला केला आहे. या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाल्याचं पाहून सासऱ्यांनी दुचाकी घेऊन पलायन केलं होतं. चाकूहल्ल्यानंतर संतोषनगरमधील काही लोकांनी सून राधिका यांना तातडीनं चाकण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर दुसरीकडे सासरे पुरुषोत्तम यांनी पुणे-नाशिक महामार्गावर एका भरधाव डंपरखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर बेशुद्धावस्थेत असणाऱ्या पुरुषोत्तम यांना काहीजणांनी रुग्णालयात दाखल केलं. सून आणि सासऱ्यावर चाकण येथील क्रिटीकेअर याठिकाणी उपचार सुरू होते. हेही वाचा- पतीची हत्या करुन रस्त्याच्या कडेला फेकला मृतदेह, नंतर पोलीस ठाण्यात केली तक्रार याठिकाणी उपचार सुरू असताना गुरुवारी सासरे पुरुषोत्तम येवले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर सून राधिका यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. राधिका यांच्या अंगावर सासऱ्याने अनेक ठिकाणी चाकूनं वार केले आहेत. त्यामुळे राधिका यांची प्रकृत्ती देखील चिंताजनक आहे. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात