मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मिल्खा सिंग यांना Flying Sikh नाव का पडलं? धावपटूला आयुष्यात या गोष्टीची नेहमी राहिली खंत

मिल्खा सिंग यांना Flying Sikh नाव का पडलं? धावपटूला आयुष्यात या गोष्टीची नेहमी राहिली खंत

शुक्रवारी रात्री वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (Milkha Singh passed away) घेतला. मागील काही दिवसांपासून ते कोरोनासोबत लढा देत होते.

शुक्रवारी रात्री वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (Milkha Singh passed away) घेतला. मागील काही दिवसांपासून ते कोरोनासोबत लढा देत होते.

शुक्रवारी रात्री वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (Milkha Singh passed away) घेतला. मागील काही दिवसांपासून ते कोरोनासोबत लढा देत होते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 19 जून : मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. शुक्रवारी रात्री वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (Milkha Singh passed away) घेतला. मागील काही दिवसांपासून ते कोरोनासोबत लढा देत होते. मिल्खा सिंग यांच्या वेगानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. एका दशकाहून अधिक काळ त्यांनी ट्रेक अॅण्ड फिल्डमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. त्यांची जन्म 20 नोव्हेंबर 1929 मध्ये गोविंदपुरामधील एका शीख कुटुंबात झाला. फाळणीनंतर ते भारतात आले होते.

मिल्खा सिंग यांना लहानपणीपासूनच खेळात रस होता. भारतात आल्यानंतर ते सैन्यात सामील झाले होते, इथूनच त्यांच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सैन्याने मिल्खा सिंग यांना तीन वेळा नाकारलं होतं. चौथ्यांदा त्यांची निवड झाली आणि सैन्यात असताना त्यांनी आपल्या कौशल्यांना आणखी परिष्कृत केले. क्रॉस-कन्ट्री रेसमध्ये मिल्खा सिंग 400 हून अधिक सैनिकांसह धावले होते. ज्यात ते सहाव्या स्थानी आले. हा तोच काळ होता ज्यानं त्यांचं नशीब बदललं आणि त्यांच्या मजबूत कारकिर्दीचा पाया घातला गेला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आपली छाप सतत सोडली.

Flying Sikh मिल्खा सिंग यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान निधन

कसं पडलं फ्लाईंग शीख नाव -

मिल्खा सिंग यांनी राष्ट्रीय खेळांशिवाय कॉमनवेल्श गेम्समध्ये एक आणि आशियाई स्पर्धेत 4 गोल्ड मेडल पटकावले आहेत. मात्र, मिल्खा सिंग यांनी फ्लाईंग शीख नाव का पडलं हे तुम्हाला माहिती आहे का? हे नाव त्यांना एका पाकिस्तानी धावपटूला हरवल्यामुळे पडलं आहे. मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानच्या चोटीमधील धावपटू अब्दुल खालिक यांनी हरवलं होतं. यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान फील्ड मार्शल आयूब खान यांनी त्यांना द फ्लाईंग शीख नाव दिलं होतं. मिल्खा यांना हे पदक देत आयूब खान म्हणाले, की आज मिल्खा धावत नव्हते तर लढत होते, त्यामुळे आम्ही त्यांनी फ्लाईंग शीखचा किताब देत आहोत.

खाकी वर्दीतील माणुसकी! आजींच्या मदतीला आले नागपूर पोलीस; होतोय कौतुकाचा वर्षाव

आयुष्यात या गोष्टीची खंत ­

रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते. यामुळे त्यांना चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं होतं. मिल्खा यांनी या स्पर्धेत पदक न मिळण्याचं कारण एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. ते म्हणाले, माझी सवय होती, की प्रत्येक शर्यतीवेळी मी एकदा मागे वळून पाहायचो. ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यत खूप जवळ होती आणि मी जबरदस्त सुरुवात केली. मात्र, यात मी एकदा मागे वळून पाहिलं आणि कदाचित ही चूक मला महागात पडली. या शर्यतीत कांस्यपदक विजेत्याचा वेळ 45.5 होता तर मिल्खा सिंग यांनी 45.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली होती.

First published:

Tags: Coronavirus, Olympic, Sports