Home /News /mumbai /

Cyclone Nisarga मुंबई पुन्हा एकदा थोडक्यात वाचली; हे आहे कारण

Cyclone Nisarga मुंबई पुन्हा एकदा थोडक्यात वाचली; हे आहे कारण

निसर्ग आलं आणि बेमालूमपणे मुंबईला थोडासा हलका धक्का देत पुढे निघूनही गेलं. या वादळाने मुंबईचं अपेक्षित होतं त्या मानाने कमी नुकसान झालं. मुंबई वाचली. काय आहे यामागचं कारण?

  मुंबई, 3 जून : सुमारे 100 वर्षांपेक्षा जास्त काळाने जूनमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने मुंबईची झोप उडवली होती. (Cyclone Nisarg) निसर्ग नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झालं आणि ते मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलं त्या वेळी आता मुंबईची पापं भरली की काय अशीच प्रतिक्रिया सामान्यांकडून व्यक्त होत होती. कारण मुळात मुंबईत चक्रीवादळ धडकणं ही गोष्ट तशी दुर्मीळ. पण निसर्ग आलं आणि बेमालूमपणे मुंबईला थोडासा हलका धक्का देत पुढे निघूनही गेलं. या वादळाने मुंबईचं अपेक्षित होतं त्या मानाने कमी नुकसान झालं. मुंबई वाचली. काय आहे यामागचं कारण? मुंबईची भौगोलिक स्थिती आणि स्थान यामुळे हे महाकाय शहर चक्रीवादळाच्या संकटापासून वाचत आलं आहे. मुळात पश्चिम किनाऱ्यावरच्या अरबी समुद्रात वादळं कमी येतात. 1948 मध्ये आलेलं वादळ मुंबईने आतापर्यंत पाहिलेलं अलीकडच्या काळातलं विद्ध्वंसक चक्रीवादळ म्हणता येईल. त्यानंतर नोव्हेंबर 2009 मध्ये आलेलं फयान वादळ नुसतंच हुलकावणी देऊन समुद्रातूनच पुढे निघून गेले होतं. पुढे आलेलं क्यार किंवा इतर वादळं अरबी समुद्रातून एक तर ओमानकडे गेली किंवा मुंबईला बाजूला ठेवत गुजरातला जाऊन धडकली. मुंबईच्या भौगोलिक स्थानामुळे हे शहर आतापर्यंत वादळी तडाख्यातून वाचत आलं आहे. 1948 रोजी मुंबईत आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून रस्त्यावर पडल्यानं रस्ते बंद झाले होते. अनेक घरांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालं होतं. या वादळी संकटातून उठायला मुंबईला बराच काळ द्यावा लागला होता तेव्हा. पहिल्या अर्ध्या तासात वादळाचं रौद्र रूप, हे 15 PHOTOS दाखवतायत विध्वंसक दृश्यं आता 1948 ची पुनरावृत्ती होणार का असं बोललं जात होतं. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ताशी 100 किमी चे वारे वाहणार होते. त्यामुळे मुंबई हलली असती हे निश्चित. प्रत्यक्षात मुंबई वाचली, कारण निसर्ग वादळ अपेक्षित जागेपेक्षा थोडं दक्षिणेला जमिनीवर धडकलं. एकदा जमिनीवर आल्यावर वादळाची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. पहिला फटका अलिबाग परिसराला आणि रायगड जिल्ह्याला बसला आणि वादळाने थोडी दिशा बदलत पनवेल, खोपोलीचा रस्ता धरत उत्तर आणि ईशान्येकडे वाटचाल सुरू केली. त्यामुळे मुंबई थोडक्यात वाचली.
  Photo Courtesy: TOI
  नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ सारख्या दूरच्या उपनगरांना खुद्द मुंबईपेक्षा थोडा जास्त फटका बसला. तरीही तो अपेक्षेपेक्षा कमीच होता. 1948 मध्ये आलेल्या चक्रीवादळानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. बंदर परिसरातील अनेक भागांमध्ये तर खूप जास्त नुकसान झाल्यानं नागरिकांना या वादळाचा मोठा फटका बसला होता. तसं झालं असतं, तर आधीच कोरोनाव्हायरसमुळे हबकलेल्या महाराष्ट्राला या दुहेरी संकटातून सावरणं अवघड गेलं असतं. निसर्गाची कृपा झाली आणि निसर्गाचं संकट थोडक्यात निभावलं. अन्य बातम्या निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतरचे VIDEO आले समोर, काळीज होईल धस्स ...आणि बघता बघता अख्खं लोखंडी होर्डिंग वाऱ्याने उडवलं; डोंबिवलीचे VIDEO VIRAL
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Cyclone

  पुढील बातम्या