सुरुवातीला एक गाडी या साइन बोर्डच्या खालून गेली. त्यानंतर विरुद्ध दिशेनं दुसरी गाडी आली आणि गाडी साइन बोर्डखाली येताच हा बोर्ड पडला. गाडीच्या पुढील भागावर बोर्ड कोसळला आहे. त्यामुळे गाडीचालकाला दुखापत झाल्याची शक्यता आहे. बोर्डजवळील जनावरं आणि माणसं मात्र तिथून लगेच पळाल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचे दोन बळी निसर्ग चक्रीवादळाने राज्यात दोन जणांचा बळी घेतला. निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबागमध्ये गेला आहे. अलिबागमधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर विजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला. वाहागव येथील नवले कुटुंबाचं घर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झालेत. हे वाचा- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात राज्यात गेला 2 जणांचा बळी, कोट्यवधींचं नुकसान दरम्यान रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकाळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.वाऱ्यामुळे चालत्या गाडीवर पडला भला मोठा साइन बोर्ड, कच्छमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल #NisargaCyclone pic.twitter.com/totlUBX2Am
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyclone