जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / निसर्गाचा प्रकोप टळला, पण मान्सून मात्र लांबला

निसर्गाचा प्रकोप टळला, पण मान्सून मात्र लांबला

निसर्गाचा प्रकोप टळला, पण मान्सून मात्र लांबला

चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच मान्सूनसाठी पुन्हा पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 3 जून : चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात आज कोणतीही प्रगती झाली नसल्याचं निरीक्षण पुणे वेधशाळेनं नोंदवलं आहे. मान्सूनचा प्रवास हा आजवर खरंतर नियोजित वेळापञकानुसारच सुरू होता. पण काल अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने हवेतील सगळी आर्द्रता शोषून घेतल्याने मान्सूनच्या प्रवासात तात्पुरता अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून खरंतर 1 जूनलाच केरळच्या किनारपट्टीवर येऊन धडकला आहे. त्याचा यापुढचा प्रवासही अगदी कालपर्यंत योग्य आणि नियोजित वेळेनुसारच कर्नाटकच्या दिशेनेच सुरू होता, पण मध्येच अरबी समुद्रात निसर्ग हे चक्रीवादळ निर्माण झालं आणि ते आज किनारपट्टीच्या दिशेने ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने धडकलं आणि मान्सूनचं सगळं गणितच बिघडून गेलंय… पण चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच मान्सूनसाठी पुन्हा पोषक वातावरण निर्माण होईल आणि मान्सून पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. पण त्यासाठी अरबी समुद्राच्या आकाशात पुन्हा आद्रता वाढीस लागणे गरजेचे आहे, असंही हवामान खात्याने म्हटलंय. महाराष्ट्रात साधारणपणे 7 जूनला मान्सूनचं आगमन होतं. पण चक्रीवादळामुळे त्यात एक दोन दिवसांचा विलंब होऊ शकतो. अर्थात ते देखील पुढील हवामान नेमकं कसं बदलतंय यावरच अवलंबून असणार आहे

News18

कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर आणखी एक संकट आलं होतं. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. काही तासात हे वादळ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती सांगितली जात होती. मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब समोर आली. चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी वर्तवली आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे. हे वाचा- मोदी सरकारने  शेतकऱ्यांसाठी घेतला हा सर्वात मोठा निर्णय, 5 दशकांची मागणी पूर्ण बापरे! मुंबई विमानतळावर थोडक्यात टळला अपघात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cyclone
  • First Published :
जाहिरात
जाहिरात