मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : छातीत चाकू खुपसल्याने रक्तबंबाळ झाला होता तरुण; फक्त रिकाम्या चिप्सच्या पॅकेटने पोलिसाने वाचवला जीव

VIDEO : छातीत चाकू खुपसल्याने रक्तबंबाळ झाला होता तरुण; फक्त रिकाम्या चिप्सच्या पॅकेटने पोलिसाने वाचवला जीव

एका रिकाम्या पॅकेट्सचा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो, हे या पोलिसाने दाखवून दिलं.

एका रिकाम्या पॅकेट्सचा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो, हे या पोलिसाने दाखवून दिलं.

एका रिकाम्या पॅकेट्सचा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो, हे या पोलिसाने दाखवून दिलं.

वॉशिंग्टन, 02 ऑगस्ट : चिप्स खाऊन झाले की आपण रिकामं पाकिट कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. पण याच पॅकेटमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे (Police saved man live with empty chips packet). एका पोलिसाने ही कमाल केली आहे. चाकू हल्ल्यात (Knife attack) रक्तबंबाळ झालेल्या एका तरुणाला पोलिसाने (Police saved man life) फक्त एका रिकाम्या चिप्सच्या पॅकेटने वाचवलं (Empty chips packet) आहे. अमेरिकेतील या घटनेच्या व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.

न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर एका तरुणावर चाकू हल्ला झाला. त्याच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले. तरुण रक्तबंबाळ झाला होता. तो रस्त्यावरच आपल्याला वाचवण्यासाठी मदत मागत होता. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला वाचवण्यासाठी जे केलं त्याचीच चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक छातीतून रक्त वाहणारा तरुण आणि त्याच्या आजूबाजूला काही लोक आहेत.

हे वाचा - अंडरविअर घालून मासे पकडताना प्रायव्हेट पार्टला लटकला खेकडा आणि... Shocking video

तुम्ही ऐकू शकता पोलिसाचा आवाज ऐकू येत आहे. हा पोलीस एका व्यक्तीला चिप्सचे पॅकेट आणि टेप आणायला सांगतो. त्यानंतर दोन लोकांना बोलावून त्या तरुणाला जमिनीवर झोपवतो. त्यानंतर त्याच्या छातीवर जिथं चाकू हल्ला झाला तिथं ते चिप्सचं पॅकेट ठेवतो आणि त्यावर टेप लावतो. आता तुम्ही म्हणाल की यामुळे या तरुणाचा जीव कसा काय वाचला? तर पोलिसाने जे केलं त्यामुळे तरुणाचा रक्तस्राव कमी झाला. त्याचं रक्त वाहणं थांबलं. त्यानंतर डॉक्टर्सही घटनास्थळी आले आणि त्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि तरुणाचा जीव वाचला.

हे वाचा - रस्त्यावर छेड काढणं पडलं महागात; तरुणीनं गाडीसह मागे खेचलं अन्..; पाहा VIDEO

न्यूयॉर्क सिटीच्या पोलीस आयुक्तांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जुलैला घडलेली ही घटना आहे. रोनाल्ड केनेडी (Ronald Kennedy ) असं पोलिसाचं नाव आहे. त्यांनी या पोलिसाचं कौतुक केलं आहे. व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्याने जे काम केलं आहे, त्यासाठी सर्वजण सॅल्युट करत आहेत.

First published:
top videos

    Tags: America, Attack, Shocking viral video, Viral, Viral videos