• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रस्त्यावर छेड काढणं युवकाला पडलं महागात; तरुणीनं गाडीसह मागे खेचलं अन्..; पाहा VIDEO

रस्त्यावर छेड काढणं युवकाला पडलं महागात; तरुणीनं गाडीसह मागे खेचलं अन्..; पाहा VIDEO

भावनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, की जेव्हा तो पळ काढू लागला तेव्हा मी माझी पूर्ण ताकत लावून त्याला मागे खेचलं. तो आपल्या स्कूटीची रेस वाढवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मी अर्धा मिनिटापर्यंत गाडीचा मागचा टायर वरती उचलून धरला

 • Share this:
  नवी दिल्ली 02 ऑगस्ट : देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, बलात्कार (Rape) आणि लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Assaults) घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या (Delhi) हौज खास परिसरातील दोन मुलींची छेढ काढल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. अशात आता आसाममधील एका तरुणीसोबतही अशीच एक घटना घडल्याचं प्रकरण समोर आलं आहे, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झालं आहे. दिल्लीप्रमाणेच इथेही तरुणीनं आरोपीला चांगलाच धडा शिकवला आहे. यासाठी मुलीच्या धाडसाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. VIDEO: मुलांसोबत आईचं राक्षसी कृत्य; नग्न करून मारहाण, संतापजनक कारण समोर मुलाला धडा शिकवणाऱ्या या तरुणीचं नाव भावना कश्यप असं आहे आणि तिनं स्वतः आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. भावनानं सांगितलं, की दिवसाच्या उजेडात एक व्यक्ती तिच्या अत्यंत जवळ आला आणि तिला कोणत्या तरी जागेचा पत्ता विचारू लागला. यावर भावनानं आपल्याला हा पत्ता माहिती नसल्याचं सांगितलं. इतक्यात स्कूटीवर असलेल्या या व्यक्तीनं भावनाच्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भावनानंही संपूर्ण ताकत लावून या मुलाला पकडलं आणि त्याला पळू दिलं नाही. भावनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, की जेव्हा तो पळ काढू लागला तेव्हा मी माझी पूर्ण ताकत लावून त्याला मागे खेचलं. तो आपल्या स्कूटीची रेस वाढवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मी अर्धा मिनिटापर्यंत गाडीचा मागचा टायर वरती उचलून धरला आणि मग जोरानं धक्का दिला. यामुळे स्कूटी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात घुसली. महिलेसमोरच कपडे काढून प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला पोलीस; सांगितलं विचित्र कारण भावनानं आपल्या पोस्टमध्ये या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासोबतच एक व्हिडिओ आणि फोटोदेखील अपलोड केला आहे. जेणेकरून लोकांना व्यवस्थितरित्या समजेल, की तिच्यासोबत नेमकं घडलं काय. भावनाच्या म्हणण्यानुसार, ही घटना गुवाहाटीच्या जीएस रोडवर घडली आहे. आरोपीचं नाव मधुसना राजकुमार असं असल्याचं समोर आलं आहे. प्रकरण वाढत असल्याचं पाहता आसाम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. भावनाची पोस्ट फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: