• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! अंडरविअरवर मासे पकडणं भलतंच महागात; खेकड्याने करकचून धरला प्रायव्हेट पार्ट आणि... Shocking video

OMG! अंडरविअरवर मासे पकडणं भलतंच महागात; खेकड्याने करकचून धरला प्रायव्हेट पार्ट आणि... Shocking video

खेकड्याने प्रायव्हेट पार्ट धरताच तरुणाची भयंकर अवस्था झाली.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑगस्ट : पाऊस म्हटलं की मासे आलेच. पावसात नदी-तलाव भरतात आणि मग लोक मासे पकडण्याची (Catching Fish) संधी काही सोडत नाहीत. मासे पकडण्याची आणि खाण्याची हौस असणारे लोक मासे पकडण्यासाठी नदी-तलावांकडे धाव घेतात. पण कधीकधी मासे पकडणं चांगलंच महागात पडू शकतं. अशाच एका तरुणाचा (Man Catching Fish) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. हा तरुण मासे पकडायला गेला पण ते तिला इतकं महागात पडलं की त्याने काय कुणीच कल्पना केली नसेल. मासे पकडण्यासाठी हा तरुण पाण्यात उतरला आणि खेकड्याने (Crab) त्याच्या प्रायव्हेट पार्ट पकडला (Crab stuck on private part). आय कॅचिंग प्लस ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही शॉक बसेल. हे वाचा - जबड्यातील कुत्र्याला सोडून मगरीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता हा तरुण फक्त अंडरविअरवरच मासे पकडत होता. मासे काय त्याच्या जाळ्यात आले नाही. पण एक खेडका मात्र त्याच्या अंडरविअरला लटकला. तरुणाच्या दोन जांघांच्या मधोमध हा खेकडा दिसतो आहे. त्याने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला दोन्ही बाजून घट्ट पकडून ठेवलं आहे. आता खेकड्याने पकडणं, तेसुद्धा प्रायव्हेट पार्टला. यावरून या तरुणाला किती वेदना होत असतील याची कल्पना करूनच आपल्याला घाम फुटतो. हे वाचा - रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसला जंगलाचा राजा; धडकी भरवणारा VIDEO आला समोर तरुण वेदनेने ओरडताना दिसतो आहे. त्याचे मित्र त्याच्या मदतीला येतात. ते त्याला दोन्ही बाजूंनी धरून उचलून पाण्यातून बाहेर नेलं. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टला लटकलेल्या खेकड्याला काढण्याचा प्रयत्न केला. पण खेकड्याने खूप करकचून धरलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: