मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Yuck! हे काय आहे? पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच Pizza खाणार नाही

Yuck! हे काय आहे? पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच Pizza खाणार नाही

एका व्यक्तीला पिझ्झामध्ये असं काही सापडलं की पाहूनच उलटी येईल.

एका व्यक्तीला पिझ्झामध्ये असं काही सापडलं की पाहूनच उलटी येईल.

एका व्यक्तीला पिझ्झामध्ये असं काही सापडलं की पाहूनच उलटी येईल.

  • Published by:  Priya Lad

ऑकलँड, 14 जानेवारी : वेगवेगळं टॉपिंग, त्यावर चीझ आणि गरमागरम सर्व्ह करताच येणारा सुगंध... आहाहा... पिझ्झा (Pizza) म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तुम्हीही पिझ्झा चवीने खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी (Pizza news). सर्वात प्रसिद्ध पिझ्झा हाऊसच्या पिझ्झामध्ये असं काही दिसलं आहे, पाहूनच तुम्ही शॉक व्हाल.

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये एका व्यक्तीने आपल्या सोशल मीडियावर पिझ्झाचे काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्ही कदाचित आयुष्यात कधीच पिझ्झा खाणार नाही. या व्यक्तीने डोमिनोजमधून पिझ्झा घेतला. तो पिझ्झा घरी पार्सल घेऊन आला. त्याला खूप भूक लागली होती आणि पिझ्झा खायचंही मन झालं होतं. त्यासाठी त्याने घरी येताच पटापट बॉक्स उघडला. पण त्यावेळी पिझ्झात त्याला असं काही दिसलं की तो हैराण झाला.

हे वाचा - शरीरावर कमी की काय म्हणून डोळ्यातही टॅटू करायला गेली; मॉडेलची झाली भयानक अवस्था

रेगीनाल्ड थालारी असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. रेगीनाल्डने सांगितलं, त्याने डोमिनोजवरून चार पिझ्झा घेतले होते. आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तो पिझ्झा पार्टी करत होता.

पिझ्झाचे काही स्लाइज त्याने खाल्ले. त्यानंतर टॉपिंग्सवर त्याला काहीतरी हलताना दिसलं. आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्याने ते नीट पाहिलं, तेव्हा त्यांन उलटीच आली. त्या पिझ्झावर चक्क किडे चालत होते. डोमिनोज पिझ्झामध्ये किडे दिसतील असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया या व्यक्तीने दिली.

हे वाचा - तुम्ही फास्टफूडचे फॅन आहात का? Immunity शी खेळ करून घेताय, या आजाराला पडाल बळी

दरम्यान हे फोटो व्हायरल होतोच डोमिनोजने मात्र हे नाकारलं आहे. आपण फ्रेश पिझ्झा बेक करतो. त्यामुळे त्यात किडे असणं शक्यच नाही. बेक करताना किडे नष्ट होतील, असं डोमिनोजने सांगितलं. तरी तक्रारीनंतर डोमिनोजने या व्यक्तीला रिफंड दिला आहे.

First published:

Tags: Food, New zealand, Pizza, Viral, Viral news