नवी दिल्ली, 13 जानेवारी – आजकालच्या अनियमित लाइफस्टाइलमध्ये खाण्या-पिण्यासाठी वेळ काढणं कठीण झालं आहे. लोकं खाण्याला आता टेक इट इजी घेतात. म्हणजेच जिथं जे मिळतं ते खाऊन घेतात. या कारणामुळेच बहुतांश लोक हेल्दी डाएटऐवजी फास्टफूडला (Fast Food) प्राधान्य देतात. फास्टफूडची पुरेशी उपलब्धता असणे हेच अतिसेवनाचे कारण बनले आहे. फास्टफूडचे अतिसेवन माणसाला कोणत्या पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकते हे नुकत्याच झालेल्या एका स्टडीत समोर आलं आहे.
डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ फास्टफूड खाण्याचे अनेक तोटे सांगतात. परंतु इंग्लंडमध्ये झालेल्या एका स्टडीतील माहितीनुसार, फास्टफूडच्या अतिसेवनाने लोकांची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) प्रभावित होत आहे. द गार्डियन (The Guardian) च्या न्यूज रिपोर्टनुसार, बर्गर आणि चिकन नगेट्ससह जड प्रक्रिया केलेले फूड खाल्ल्याने जगभरात स्वयंप्रतिकार आजार म्हणजेच ऑटोइम्युन आजारात (autoimmune diseases) वाढ होत आहे. फास्टफूडमुळे लोकांचे इम्युन सिस्टिम खराब होत आहे. वैज्ञानिकांच्या मते, फास्टफूडमुळे एक निरोगी पेशी आणि शरीरावर आक्रमण करणारे विषाणूंसारखे जीव यांच्यातील फरक रोगप्रतिकारक शक्ती ओळखू शकत नाही. त्यामुळे लोक पीडित झाले आहेत. या आाजाराला Auto immune Disease म्हणतात.
फायबर कॉम्पोनंटची कमतरता हेच मुख्य कारण
इंग्लंडमधील फ्रांसिस क्रिक इन्स्टिट्यूट (Francis Crick Institute) चे संशोधक याच्या कारणांवर अभ्यास करत आहेत. फास्टफूड आहारात फायबरसारखे अवयवांच्या (components) कमतरतेमुळे असे होते. हे एखाद्या व्यक्तीच्या मायक्रोबायोम (microbiome) ला प्रभावित करतात. आपल्या पोटामध्ये असलेला सूक्ष्मजिवांचा संग्रह यालाच मायक्रोबायोम असं म्हणतात. आपल्या शरीरातील विविध क्रिया नियंत्रित करण्याची महत्त्वाची भूमिका मायक्रोबायोम निभावतात.
पाश्चिमात्य देशात 40 लाख लोग प्रभावित
ब्रिटनमध्ये ऑटोइम्युन आजार झालेले जवळपास 40 लाख लोक आहेत. आतंरराष्ट्रीय पातळीवर अशी प्रकरणे दर वर्षी 3 ते 9 टक्क्यांच्यादरम्यान वाढत आहेत. पूर्वी झालेल्या अभ्यासात पर्यावरणीय घटक आणि अशा परिस्थितीत वाढ होण्यामध्ये एक दुवा सापडला होता. यामध्ये शरीरात अधिक मायक्रोप्लॅस्टिक कण (microplastic particles) चा प्रवेश समाविष्ट आहे. गेल्या काही दशकांमध्ये मानवाच्या अनुवांशिकीमध्ये (human genetics) कोणताही बदल झालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips