वॉशिंग्टन, 13 जानेवारी : हल्ली शरीरावर टॅटू काढणं म्हणजे एक फॅशनच झाली आहे. बरेच लोक टॅटू काढून घेतात. छोटंसं नाव किंवा एखादं साइन का असेना पण टॅटू काढतात. काहींना तर टॅटूचं इतकं वेड असतं की अगदी शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू करून घेतात, तर काही लोक केसापासून नखापर्यंत संपूर्ण शरीरावरच टॅटू काढतात (tattoo side effects). अशाच लोकांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील एका महिलेला तिचं टॅटूचं हे वेड चांगलंच महागात पडलं आहे (model blind due to eye tattoo).
टेक्सासमध्ये राहणारी 26 वर्षांची सारा सब्बाथ (Sarah Sabbath) मॉडेल आणि टॅटू आर्टिस्ट आहे. तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर तिने टॅटू काढला आहे. शरीरावर एक असा भाग नाही, जिथं टॅटू नाही. तिला पाहिलं तर टॅटूच टॅटू दिसतील. तब्बल 100 टॅटू तिच्या शरीरावर आहेत. शरीरावर टॅटू काढण्यापर्यंत ठिक होतं पण त्यावरही तिची हौस काही भागली नाही. तिला टॅटूचं इतकं वेड लागलं की तिने डोळ्यांमध्येही टॅटू करायचं ठरवलं.
हे वाचा - अपघातानंतर 'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा पहिला VIDEO; हात जोडून म्हणाला...
ती आय टॅटू करण्याचा निर्णय घेतला. शरीराप्रमाणे डोळेही कलरफुल करायला गेली. आय टॅटूची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तिने आपले डोळे उघडलं, तेव्हा तिला झटका बसला . कारण तिला स्पष्ट काहीच दिसत नव्हतं (model blind due to eyeball ink). तरी तिने धीर धरला, थोड्या वेळाने आपल्याला दिसेल असं तिला वाटलं. पण तसं काहीच झालं नाही. अखेर आपण डोळ्यांची दृष्टी गमावल्याचं तिला कळून चुकलं (eye tattoo cause blindness).
तिने सांगितलं, टॅटू करणाऱ्याने आपल्या डोळ्यात पुरेशा प्रमाणात सलाइन टाकली नाही. शाई जास्त होती त्या तुलनेत वॉटर सोल्युशन पुरेसं नव्हतं. ज्यामुळे ती आंधळी झाली.
हे वाचा - VIDEO : डान्स करताना केलेली एक चूक भोवली; मंडपातच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव
बरं आता इतकं झाल्यावर तरी तिचं टॅटूचं वेड काही गेलं नाही. जास्त दिवस ती टॅटूपासून दूर राहिली नही. तिने चेहऱ्यावर बरेच टॅटू करून घेतले. डेली स्टारच्या मते जेव्हा तिच्या शरीरावर टॅटू काढले जातात तेव्हा तिला खूप आनंद होतो, तिला टॅटू बनवताना सुया टोचून घ्यायला खूप आवडतं. ही माझी सवय झाली आहे. सुरुवातीला वेदनेची तिला भीती वाटते. पण सुई टोचताच चांगलं वाटलं, असं ती सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.