मराठी बातम्या /बातम्या /Viral /स्टेशनवरील Free Wifi वापराल तर कामातून जाल, धक्कादायक पोलखोल

स्टेशनवरील Free Wifi वापराल तर कामातून जाल, धक्कादायक पोलखोल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तुम्ही सार्वजनिक वायफायशी तुमचा फोन कनेक्ट केलात. तर तुम्ही स्वत:च संकटांना बोलवताय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 26 जानेवारी : आता बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक वायफाय फ्रीमध्ये उपलब्ध झाला आहे. ज्याचा वापर करुन लोक आपली बरीच कामं करतात. त्यात रेल्वेस्टेशनवर देखील आता फ्री वायफाय उपलब्ध आहेत. अनेक लोकांनी असा फ्री वायफाय वापरला असणार. पण तुम्हाला माहितीय का? की असं करुन तुम्ही स्वत:वर संकट ओढून घेताय.

हो कारण सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफाय वापरणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हे आम्ही असं का म्हणत आहोत, चला पाहू.

हे ही पाहा : मोबाईल नंबर कोणालाही न दाखवता करा कॉल, कसं? ही ट्रिक करेल मदत

तुमचा विश्वास बसणार नाही, पण सार्वजनिक वायफाय पूर्णपणे सुरक्षित नाही, जरी ते सरकारने लावलेले असोत किंवा मग खाजगी कंपनीने ते स्थापित केले. खरं तर, सार्वजनिक वायफायचा वापर आजकाल लोक कर्ज घेण्यासाठी करत आहेत. तसेच यावरुन काही लोक बँकेची काम देखील करतात, तर या अशा लोकांना हॅकर्स सहजपणे टार्गेट करतात आणि त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करून त्यांची लूट करतात.

सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती असते. त्याच्या फोननंबर पासून ते इमेल आयडी आणि त्याच्या मित्रांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळं काही कळतं. त्यामुळे जर तुम्ही सार्वजनिक वायफायशी तुमचा फोन कनेक्ट केलात. तर तुम्ही स्वत:च संकटांना बोलवताय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय

हॅकर्सला तुमच्या फोनची बरीचशी माहिती मिळेल, ज्याच्या मदतीने ते तुमचे स्मार्टफोन सहजपणे हॅक करू शकतात. तुम्हाला हे नको असेल तर चुकूनही तुमचा स्मार्ट फोन पब्लिक वायफायशी जोडण्याची चूक करू नका.

First published:

Tags: Railway, Shocking, Social media trends, Top trending, Viral, Viral news