जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोबाईल नंबर कोणालाही न दाखवता करा कॉल, कसं? ही ट्रिक करेल मदत

मोबाईल नंबर कोणालाही न दाखवता करा कॉल, कसं? ही ट्रिक करेल मदत

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लपवून एखाद्याला कॉल करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 25 जानेवारी : तुम्ही प्रायव्हेट नंबरबद्दल ऐकले असेल ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्याला कॉल करते तेव्हा त्याचा नंबर तुमच्या मोबाइल फोनवर दिसत नाही. अशावेळी ना आपल्याला समोरच्या व्यक्तीचा नंबर मिळत ना पुन्हा कॉल करता येत. पण प्रत्येकाला खाजगी क्रमांक मिळू शकत नाही. पण जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही फारसं काहीही न करता तुमचा कॉलर आयडी लपवू शकता तर? म्हणजेच तुम्ही कोणालाही फोन केलात तर त्याला तुमचा कॉलर आयडी दिसणार नाही. लपवून एखाद्याला कॉल करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचा नंबर लपवू शकता, ज्यामुळे कॉल घेणारा व्यक्ती गोंधळून जाईल. हे ही पाहा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं? तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमधून तुमचा नंबर लपवून कोणालाही सहज कॉल करू शकता, यासाठी बाजारात अनेक ऍप्स आणि अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. यापैकी बर्‍याच वेबसाइट्स आणि ऍप्सची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे तुम्ही आधी ट्राय करा आणि नंतर या सेवेचे सदस्यत्व घ्या. जर तुम्हाला ही सेवा सबस्क्रिप्शनशिवाय वापरायची असेल, तर तुम्ही फक्त काही मिनिटांसाठीच एखाद्याला कॉल करू शकता, परंतु जर तुम्हाला ही सेवा नेहमीच्या वापरासाठी घ्यायची असेल तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील आणि तुम्ही ही सेवा साप्ताहिक किंवा मासिक आधारावर वापरू शकता. आता ही सेवा किंवा ऍप कसा वापरता येतो. चला जाणून घेऊ जर तुम्हाला वेबसाइट किंवा ऍपद्वारे एखाद्याला कॉल करायचा असेल तर प्रथम तुम्हाला अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन साइन इन करावे लागेल. साइन इन केल्यानंतर, तुम्हाला या सेवेचे सदस्यत्व घ्यावे लागेल. तुम्ही या सेवेची सदस्यता घेतल्यानंतर, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कॉल करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

यानंतर तुमचा आयडी कोणालाही कळणार नाही. पण हे लक्षात ठेवा की ही सेवा इंटरनेटवर आधारित आहे, त्यामुळे इंटरनेट कनेक्शन असणेही खूप महत्त्वाचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात