नवी दिल्ली, 13 एप्रिल : कोरोनाचा प्रसार भारतात वाढत आहे. त्यामुळं दिवसेंदिवस भीतीही वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी, लोकं याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. सामाजिक अंतर (social distancing) ठेवण्याचे आवाहन वेळोवेळी करूनही लोकं गर्दी करताना दिसत आहेत. याच मुक्या प्राण्यांनी मात्र सामाजिक भान राखत या नियमाचे पालन केले आहे. आयएफएस अधिकारी प्रवीण कसवान यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मोरांचा कळप सामाजिक अंतर राखून एकत्र बसला आहे. एकमेकांमध्ये जवळजवळ एका हाताचे अंतर आहे. प्रवीण कासवान यांनी हा फोटो शेअर करत, “लॉकडाऊनमध्ये आपल्या राष्ट्रीय पक्ष्याने सामाजिक अंतर राखले आहे. नागौर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेसमोरील हा फोटो आहे”, असे म्हंटले आहे. वाचा- महाराष्ट्रात 15 ते 20 एप्रिलमध्ये कोरोनाचा मोठा धोका, निर्बंध कडक होणार?
वाचा- 14 एप्रिलनंतर रेल्वेचे तिकीट बुक केलं आहात? जाणून घ्या काय आहे रेल्वेचं नियोजन हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुक्या प्राण्यांना कळणारी गोष्टी माणसाला का नाही कळत? असा प्रश्न उपस्थित होता. भारतात क्लस्टर ट्रान्समिशनच्या घटना समोर आल्यानंतर कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. त्यासाठीच सामाजिक अंतर बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
This one too....😊 pic.twitter.com/HonSyOAWO0
— Pawan Sharma (@psharma73) April 10, 2020
वाचा- वेदनेनं किंचाळत असलेल्या गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष, उभ्याने दिला बाळाला जन्म पोलिसांनीही केले लोकांना आवाहन लॉकडाऊनमध्ये लोकं घराबाहेर पडून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी पोलीस रात्रंदिवस गस्त घालत आहेत. अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहे. या व्हिडीओ पोस्ट करताना संजय सिंह यांनी, या पोलिस कर्मचाऱ्याच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम झाला नाही. तर, तुम्हाला वाचवणे अवघड आहे. या भावाचे ऐका, असे भावनिक आवाहन केले आहे.
इस पुलिस वाले की बात का भी अगर आप पर असर न हुआ तो आपका बचना मुश्किल, सुनिए “भाई की भावुक अपील” pic.twitter.com/uLNkXB1djW
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) April 13, 2020
खासदार संजय सिंह यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस लॉकडाऊन दरम्यान गस्त घालताना दिसत आहे. यावेळी ते, तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर होने न देंगे तुमको कोरोना, असे म्हणत आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून तरी, घरात थांबा असे आवाहन संजय सिंह यांनी केले आहे.