मुंबई 7 सप्टेंबर : आपल्या रोजच्या वापरातल्या किंवा पाहण्यातला अशा काही गोष्टी आहेत. ज्या फारच वेगळ्या आहेत. परंतू त्यांच्या संबंधी फार कमी लोकांना माहिती असते. म्हणजेच आपण या गोष्टी पाहातो, परंतू त्या अशा का आहेत? याच्याबद्दल आपण फारसा जास्त विचार करत नाही किंवा काही लोकांना यामागचं उत्तरं सापडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला आमच्या या बातमीत अशाच एका क्षुल्लक गोष्टीबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण तुम्हाला त्याबद्दल क्वचितच माहिती असेल. ती म्हणजे रुग्णवाहिका… चला जाणून घेऊ. तुम्ही रस्त्यावरुन जाताना बऱ्याचदा रुग्णवाहिका पाहिली असेल. परंतू तुम्ही कधी त्यावर लिहिलेल्या अक्षरांना नीट पाहिलं आहे? तुम्हाला या रुग्णवाहिकेवर इंग्रजीत ambulance लिहिलेलं दिसेल, परंतू त्याची अक्षरं ही उलटी लिहिलेली दिसतात. म्हणजेच ते ECNALUBMA असं लिहिलेलं असतं. ते उगाच उलटं लिहिलं जात नाही, तर ते असं लिहिण्यामागे एक निश्चित असं कारण आहे. हे वाचा : हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय का? बऱ्याच ठिकाणी नसते 13 नंबरची रुम, काय आहे यामागचं सत्य? जर तुम्ही रुग्णवाहिकेला नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, हा शब्द गाडीच्या बाजूवा उलटा लिहिलेला नसतो, तर तो गाडीच्या समोरील बाजूला उलटा लिहिला जातो. जे केवळ आरशातील प्रतिमेसाठी केलं जातं. जे समोरील वाहनचालकाना दिसेल आणि सरळ वाचता देखील येईल. हे खरंतर तुमच्या सेल्फी कॅमेरात घडतं तसंच काहीसं आहे. ज्यामध्ये मिरर इमेज दाखवली जाते म्हणजे, उलटे चित्र दिसतं. प्रत्यक्षात असे घडते की वाहनांमधील बाजूचे आणि मागील आरसे हे रेप्लिका आरसे असतात जे प्रतिमेला उलटे दाखवतात. दूरवरून येणारे वाहने यामुळे आपल्याला जवळ दिसते. अपघातांना रोखण्यासाठी हे आरसे बसवले जातात. परंतू हे सर्व पूर्णपणे विज्ञानाच्या नियमांवर अवलंबून आहे. कारण या आरशांमध्ये लिहिलेले शब्द उलटे दिसतात आणि अशा स्थितीत रुग्णवाहिका जरी सरळ लिहिली तरी ती उलटी दिसते. अशा स्थितीत वाहनावर अॅम्ब्युलन्स या शब्दाची आरशात सरळ दिसेल अशी प्रतिमा लिहिली जाते. जेणेकरून वाहन चालविणाऱ्या चालकांना हा शब्द स्पष्टपणे दिसू शकेल. अशा स्थितीत दुरून येणारी रुग्णवाहिका प्रत्यक्ष पाहता येते आणि शिवाय ती वाचता येते. हे वाचा : लाल, पिवळा, निळा नाही, तर टायरचा रंग नेहमी काळा का असतो? या मागचं कारण रंजक आता प्रश्न असा उभा राहातो की हा शब्द विशिष्ट रंगात का लिहिला जातो? खरंतर रुग्णवाहिका वाहनावर अनेकदा लाल किंवा निळ्या रंगात लिहिलेलं असतं, याचं कारण असं की हे रंग आपल्याला लांबवरुन पाहाता येतात आणि हे शब्द ठळक अक्षरात लिहिले तर मेंदू आपोआप वाचतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.