मुंबई 6 सप्टेंबर : सध्या इंटरनेटवर ऑप्टीकल इल्यूजनशी संबंधीत अनेक फोटो आणि व्हिडीओ ट्रेंड होऊ लागले आहेत. खरंतर हे ऑप्टीकल इल्यूजन फोटो किंवा व्हिडीओ आपल्या मेंदूला चालना देतात. ज्यामुळे रोजचं तेच-तेच काम करुन थकलेल्या आपल्या मेंदूला काहीतरी वेगळं करण्यासाठी मिळतं, हे असे फोटो आपल्या मेंदूला चालना देतात आणि आपली विचार करण्याची क्षमता वाढवतात. सध्या एक असाच फोटो समोर आला आहे. जो पहिल्या नजरेत साधा दिसत आहे. परंतू तो साधा नाही. हा फोटो सुकलेल्या पानांचा आहे. परंतू या पानांमध्ये एक मांजर लपली आहे, जी तुम्हला शोधून दाखवायची आहे. तर तुम्ही स्वीकारणार का हे चॅलेंज?
हे वाचा : लाल, पिवळा, निळा नाही, तर टायरचा रंग नेहमी काळा का असतो? या मागचं कारण रंजक
चला मग 10 सेकंद घ्या आणि या फोटोत लपलेली मांजर शोधून काढा. तुम्ही जर यामधील मांजर शोधून काढलीत तर तुम्ही खूपच हुशार आहात म्हणून समजा.
सोर्स : गुगल
. . . . . तुम्हाला अजूनही या फोटोत मांजर शोधता आली नसेल, तरी काळजी करु नका, आम्ही ती शोधण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहोत. यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करावं लागेल. . . . . . पाहा इथे लपलीय मांजर
सोर्स : गुगल
हे वाचा : सुंदर दिसण्यासाठी ती पार्लरमध्ये गेली, पण जेव्हा घरी परतली तेव्हा मात्र… नक्की काय घडलं? आता तर तुम्हीला मांजर दिसलीच असेल, आता तुम्ही हा फोटो तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मित्राच्या हुशारीची परीक्षा घ्या.