नवी दिल्ली 26 सप्टेंबर : सोशल मीडियावर अनेकदा विचित्र व्हिडिओ व्हायरल (Weird Video Viral on Social Media) होत असतात. कधी एखाद्या घटनेचा व्हिडिओ तर कधी आणखी काही वेगळंच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काहींना हा व्हिडिओ विनोदी वाटत आहे तर काही लोक हे दृश्य पाहून थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक महिला विना कपड्यांचीच पार्किंगमध्ये उभा असलेल्या कारवर कोसळल्याचं पाहायला मिळतं (Semi Nude Woman Fell on Car).
VIDEO : रेल्वे प्लॅटफॉर्मवर असाहाय्य आजोबांची सेवा करीत RPF जवानाने जिंकली मनं
सोशल मीडियावर (Social Media) सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली आहे. यात दिसतं की पार्किंगमध्ये एक कार उभी आहे, अचानक या कारवर एक महिला कोसळते. महिलेनं कमी कपडे घातलेले दिसत आहेत. सेमी न्यूड अवस्थेत असलेल्या या महिलेला जास्त मार लागला नाही. मात्र, वेदनांमुळे ती ओरडताना दिसत आहे.
(1) in Taiwan, a woman fell from a building onto the top of a car in her underpants while holding on to some clothing... a half-naked man rushed to give her a passionate kiss while she was obviously in pain - the couple might've been getting intimidate upstairs earlier pic.twitter.com/2tVqWZ91tn
— Raam Beart (@raam_beart) September 23, 2021
डेली स्टारसह अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की ही महिला बाल्कनीमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट (Intimate moment in balcony) झाली होती. याचवेळी तिचा तोल गेला आणि ती खाली उभ्या असलेल्या कारवर कोसळली. व्हिडिओमध्ये दिसतं, की कारचंही बरंच नुकसान झालं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ही महिला कारवर कोसळल्यानंतर काहीच वेळाच तिचा पार्टनरही तिथे आला. तो तिला कारवरुन खाली उतरवून ती ठीक आहे का हे विचारण्याऐवजी तिथेच तिला किस करू लागला.
पहिल्या नजरेत जुळलं प्रेम; लग्नानंतर पत्नीचं गुपित समोर आल्यानंतर पती हादरला!
समोर आलेल्या वृत्तानुसार, ही घटना तायवानच्या (Taiwan) ताइपे (Taipei) येथे 5 सप्टेंबरला घडली होती. तिथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं मीडियासोबत बोलताना सांगितलं, की ही घटना घडली तेव्हा मी याच रोडवरून जात होतो. मी तिला कोसळताना पाहिलं नाही मात्र खूप जोरानं आवाज झाला. जेव्हा मी तिकडे पाहिलं तेव्हा एक महिला आधीपासूनच कारवर होती आणि एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी येत होता. मिळालेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडनं किस केल्यानंतर महिलेला कारवरुन खाली उतरवत तिला रुग्णालयात नेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Romance, Shocking video viral