मराठी बातम्या /बातम्या /Viral /रेल्वे प्लॅटफॉर्मवर असाहाय्य आजोबांची सेवा करीत RPF जवानाने जिंकली मनं; भावुक करणारा VIDEO

रेल्वे प्लॅटफॉर्मवर असाहाय्य आजोबांची सेवा करीत RPF जवानाने जिंकली मनं; भावुक करणारा VIDEO

या RPF जवानाच्या कामाला सॅल्यूट...

या RPF जवानाच्या कामाला सॅल्यूट...

या RPF जवानाच्या कामाला सॅल्यूट...

मुंगेर, 25 सप्टेंबर : बिहारमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media) होत आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वे स्टेशनवर असहाय्य अवस्थेत असलेल्या वयस्कर व्यक्तींची सेवा करीत असताना एक आरपीएफ जवान (RPF Constable Viral Video) दिसत आहे. आरपीएफ जवान स्वत: त्या व्यक्तीला आपल्या हाताने आंघोत घालताना दिसत आहे. यानंतर तो त्यांना कपडेदेखील घालतो. या व्हिडीओमध्ये पोलिसांचं एक वेगळं रुप पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर रेल्वे स्टेशनचा आहे. तर व्हिडीओमध्ये मदत करणारी व्यक्ती रेल्वे सुरक्षा दल म्हणजे आरपीएफचा जवान आहे. या वयस्कर व्यक्तीला त्याच्या घरातून मारहाण करून बाहेर काढण्यात आलं होतं. ते स्टेशनवर असहाय्य पडून होते. शेवटी आरपीएफ जवान त्यांच्या मदतीसाठी पुढे आला. (RPF jawans won the heart by serving helpless grandparents on the railway platform emotional VIDEO)

हे ही वाचा-'धावपळीच्या जीवनात मनाला..'; मुंबईतील कर्मचाऱ्याचं ते काम पाहून भावुक झाले टाटा

गेल्या तीन महिन्यांपासून या स्टेशनवर एक वयस्कर व्यक्ती राहत आहेत. लखीसराय जिल्ह्यातील सूर्यगढा येथे राहणाऱ्या या व्यक्तीला तिच्या नातेवाईकांनी घराबाहेर हाकलून दिलं. कसं बसं त्या व्यक्तीला स्टेशनवर आसरा मिळाला. या वयस्कर व्यक्तीची हालत खूप खराब झाली होती. त्याचे शरीरा घाणीने माखलं होतं. यादरम्यान प्लॅटफॉर्मवर ड्यूटी करणारा आरपीएफ जवान हेड कॉन्स्टेबल अनुराग कुमारने या व्यक्तीला पाहिलं. त्यांना आधी खाण्या-पिण्याच्या वस्तू दिल्या. त्यानंतर आरपीएफने त्या व्यक्तीला स्वत: आंघोळ घातली आणि त्याच्या अंगावरील घाण स्वच्छ केली.

" isDesktop="true" id="609144" >

आरपीएफ जवानाने वयस्क व्यक्तीला आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कपडे घातले. या कामात दुसरे जवान आणि यात्रीदेखील त्याची मदत करीत होते. आरपीएफ जवान अनुरागचं हे काम पाहून प्रवाशांसह सर्वजण त्याचं कौतुक करीत होते. यापैकी कोणी त्याचा व्हिडीओ शूट केला आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Positive story, Viral video.