जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIRAL VIDEO: NUDE होऊन रस्त्यावर उभा राहिला इसम, समोरून भरधाव वेगानं गाडी आली आणि...

VIRAL VIDEO: NUDE होऊन रस्त्यावर उभा राहिला इसम, समोरून भरधाव वेगानं गाडी आली आणि...

VIRAL VIDEO: NUDE होऊन रस्त्यावर उभा राहिला इसम, समोरून भरधाव वेगानं गाडी आली आणि...

कपडे न घालता रस्त्यावर उतरला इसम, हा विचित्र VIDEO पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

कीव, 09 ऑगस्ट : भारतात रस्त्यांमुळे किंवा पावसामुळे ट्रॅफिक जाम होते, हे आपल्याला माहित आहे. मात्र युक्रेनमध्ये एक भलताच प्रकार घजला. यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागला. युक्रेनमधील कीव येथे एका व्यक्तीन नग्न अवस्थेत रस्त्यावर उतरला आणि रहदारी थांबवू लागला. या इसमामुळे रस्त्यावर अचानक गाड्यांची लांबलचक लाईन लागली. खरतर युक्रेनमध्ये असलेल्या कडक्याच्या थंडीत हा इसम नग्न अवस्थेत असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, एक नग्न मनुष्य़ रस्त्यावर फिरत आहे. काही अंतर चालल्यानंतर या इसमाने गाडी थांबवण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तो एका पांढऱ्या कारसमोर उभा राहिला. नग्न इसमाला टाळण्यासाठी कार चालकाने मा4ग बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा नग्न अवस्थेत असलेला इसम हात पसरवून गाडी समोर उभा राहिला. वाचा- याला म्हणतात जुगाड! पठ्ठ्याने ऑडीची बनवली चक्क घोडागाडी, पाहा PHOTO त्यानंतर भडकलेला गाडी चालक गाडीबाहेर आला, आणि नग्न अवस्थेत असलेल्या इसमाशी वाद घालू लागला. यादरम्यान कार चालकांनं नग्न व्यक्तीला मारलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नग्न व्यक्ती जमिनीवर पडला. वाचा- प्रपोज करण्यासाठी घरात पेटवली मेणबत्ती, गर्लफ्रेंड हा बोलणार तेवढ्यात… वाचा- VIDEO: संतापजनक! उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला सिक्युरिटी गार्डची बेदम मारहाण या घटनेचा व्हिडिओ 5 ऑगस्ट रोजी ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मात्र, कोणत्या तारखेला हे चित्रित करण्यात आले आणि या प्रकरणात पोलिसातही गुन्हा दाखल झाला आहे की नाही याची माहिती नाही. संपादन - प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात