बेलारूसमधील एका मेंढपाळाने एक भन्नाट जुगाड केला आहे. त्याचे व्हायरल होणारे फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. (फोटो सौजन्य-Reuters)
ऑडी ही गाडी तशी महागड्या गाड्यांपैकी एक आहे. मात्र एका पठ्ठ्याने चक्क ऑडीचे रुपांतर घोडागाडीमध्ये केले आहे. (फोटो सौजन्य-Reuters)
अलेक्सी उसिकोव्ह (Alexey Usikov) असं या मेंढपाळाचे नाव असून त्याने चक्क ऑडी कारचे घोडागाडीमध्ये रुपांतर केले आहे. (फोटो सौजन्य-Reuters)
ही घोडागाडी बॅटरी, हेड लाइट्स, लहान स्टोव्ह सारख्या सामानासह सुसज्ज आहे. अलेक्सीचा हा जुगाड खरंच थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य-Reuters)
त्याने जुन्या ऑडी -80 मधून ही घोडागाडी तयार केली आहे. यावेळी त्याने केवळ अर्ध्या ऑडीचा वापर केला आहे. त्यामुळे तो त्याच्या या घोडागाडीला ऑडी-40 असे देखील गंमतीत म्हणतो. (फोटो सौजन्य-Reuters)
बेलारुस (Belarus)मधील Slabodka या गावाजवळ असणाऱ्या शेतात तो त्याचा टांगा फेरफटका मारण्यासाठी नेतो. (फोटो सौजन्य-Reuters)
ऑडीपासून बनलेली ही घोडागाडी या शेतामध्ये दिमाखात पळवताना अलेक्सी दिसून येतो. (फोटो सौजन्य-Reuters)
त्याचे या गाडीबरोबरचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या इनोव्हेशनचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकते. (फोटो सौजन्य-Reuters)
ऑडीसारख्या गाडीची घोडागाडी केल्यामुळे लोकंही त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. (फोटो सौजन्य-Reuters)
दरम्यान त्याचा हा जुगाड अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या घोडागाडीतून फेरफटका मारताना त्याचे फोटो खूप चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य-Reuters)