प्रयागराज, 08 ऑगस्ट : एकीकडे कोरोना काळात एकमेकांना मदतीचा हात देत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. रुग्णालयाबाहेर गेटवर उपचारासाठी बसलेल्या वृद्ध महिलेला सिक्युरिटी गार्डनं बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला उपचार मिळावेत म्हणून रुग्णालयाबाहेर गेटवर बसून होती. सिक्युरिटी गार्डनं या महिलेला हुसकवून लावलं मात्र तरीही उपचारासाठी ही महिला विनंती करू लागली. संताप अनावर झाल्यानं अखेर सिक्युरिटी गार्डनं या महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान VIRAL होत आहे.
हे वाचा- भाजप खासदाराचा प्रताप, मध्यरात्री सलून उघडायला लावले आणि केली कटिंग, VIDEO ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे स्वरुपानी ट्रॉमा सेंटर रुग्णालयाच्या गेट बाहेर घडली आहे. हे रुग्णालय पोलीस चौकीपासून पावलाच्या अंतरावर आहे. कोरोनाच्या काळात मदत करायची सोडून अशा पद्धतीनं सिक्युरिटी गार्डनं महिलेशी केलेल्या वर्तवणुकीमुळे सोशल मीडियावरून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं या सिक्युरिटी गार्डवर कारवाईचा बडगा उचलला असून निलंबनाची कारवाई केली. त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. अमानुषपणे मारहाण करण्याऱ्या या सिक्युरिटी गार्डचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.