साऊथ यॉर्कशायर, 06 ऑगस्ट : कोरोनामुळं जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परिणामी अनेकांच्या लग्नाचे प्लॅन पुढे ढकलले गेले आहेत. दरम्यान, लग्नासाठी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी मुलं-मुली विविध सरप्राइज देतात. मात्र एक असंच एक सरप्राइज एका तरुणाला महागात पडलं. ब्रिटनमधील साऊथ यॉर्कशायरमध्ये एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी घरात मेणबत्त्त्या लावल्या, मात्र मुलगी हो बोलण्याआधीच एक भयंकर प्रकार घडला.
ब्रिटनच्या साऊथ यॉर्कशायरमध्ये एका तरुणानं गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी सरप्राइज दिले होते. यासाठी त्याने संपूर्ण घरात मेणबत्त्या लावल्या होता. गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी त्याने घर संपूर्ण फुग्यांनी सजवले होते. गर्लफ्रेंडला घरी आणण्याआधी या तरुणानं मेणबत्त्या पेटवून ठेवल्या होत्या. मात्र तरुण गर्लफ्रेंडला घेऊन घरी आला तेव्हा त्यानं पाहिले की संपूर्ण घर जळून खाक झाले होते.
वाचा-करायचं होतं एक झालं भलतंच! रोमँटिक प्रपोजने लावली आग; पाहा PHOTO
दरम्यान, या तरूणानं मेणबत्त्यांजवळच लाइट्स ठेवल्या होत्या. त्यामुळे आग घरात पसरली. साऊथ यॉर्कशायरच्या अग्निशमन विभागाने फेसबुकवर या संपूर्ण घटनेविषयी लिहिले आहे. यात त्यांनी लिहिले की या चित्रांमध्ये तुम्हाला जास्तच लाइट जळताना दिसतील.
वाचा-वेडिंग फोटोशूटवेळी झाला स्फोट, नवरीला घेऊन पळाला नवरा; Beirut Blast Video Viral
वाचा-खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून घसरली 5 वर्षांची चिमुरडी, खाली पडणार तेवढ्यात...
या घटनेनंतर सोशल मीडियावरही युझरने वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युझरनं या फोटोवर, 'लोक म्हणतात की प्रेमात पडणे धोकादायक नसते, मात्र हे पाहून काही तरी वेगळं वाटत आहे.'. दरम्यान, या घटनेत घर जळून खाक झाले असले तरी कोणाचेही नुकसान झाले नाही. मुख्य म्हणजे तरी, या मुलानं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं, आणि ती हा ही म्हणाली.
संपादन - प्रियांका गावडे