नवी दिल्ली 08 ऑगस्ट : नागिन डान्सशिवाय (Nagin Dance) तर भारतातील लग्न (Indian Wedding) पूर्ण झाल्यासारखं वाटतंच नाही. नवरदेवाचे मित्र आणि भाऊ जवळपास प्रत्येकच लग्नात अगदी रस्त्यावर आडवे होऊन नागिन डान्स करताना दिसतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच वेडिंग व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेवाचा मित्र रस्त्यावर नाही तर स्टेजवरच नागिन डान्स (Nagin Dance Video) करत आहे.
अरे बापरे! कुणाच्या हातात कुणाच्या गळ्यात, सापांना घेऊन रस्त्यात फिरतायेत लोक
या वेडिंग व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आणि नवरी (Bride and Groom) स्टेजवर बसलेले आहेत. नवरदेवाचा मित्रही तिथेच स्टेजवर (Wedding Stage) त्यांच्या सोफ्याजवळ जमिनीवर झोपला आहे. अचानक तो नागिन डान्स करू लागतो. नवरदेवही यात त्याला साथ देतो. मात्र, हा व्हिडिओ पाहतानाच विचित्र वाटत आहे. कारण, बहुतेकदा आपण नवरदेवाच्या स्वागतावेळी डीजे फ्लोरवरच नवरदेवाच्या मित्रांना डान्स करताना पाहिलं असेल. मात्र, यात तरुणानं स्टेजवरच डान्स सुरू केला आहे.
View this post on Instagram
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा Game over; मित्राने सर्वांसमोरच दिलं असं Wedding gift
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा तरुण स्वतःच्याच नादात आहे. डान्स करत असतानाच तो नवरदेवालाही डान्स करण्यासाठी आग्रह करू लागतो. सुरुवातीला नवरदेवालाही मजा येते आणि तो बसल्या बसल्याच डान्स करू लागतो. मात्र, नंतर जेव्हा मित्र त्याला उठून डान्स करण्यासाठी सांगतो, तेव्हा नवरदेव नकार देतो. नवरदेव आणि त्याच्या मित्राचा हा डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांचीही चांगलाच पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Wedding video