मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे बापरे! कुणाच्या हातात कुणाच्या गळ्यात, सापांना घेऊन रस्त्यात फिरतायेत लोक; पाहा VIDEO

अरे बापरे! कुणाच्या हातात कुणाच्या गळ्यात, सापांना घेऊन रस्त्यात फिरतायेत लोक; पाहा VIDEO

शेकडो लोक हातात साप घेऊन दिसले.

शेकडो लोक हातात साप घेऊन दिसले.

अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बिनधास्तपणे सापासोबत फिरत आहेत.

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : साप (Snake) समोर दिसला तरी अंगाला घाम फुटतो. मग त्याला हातात घेणं तर दूरच राहिलं (Snake video). सोशल मीडियावर (Social media) सापाला पकडणाऱ्या (Snake catcher) डेअरिंगबाज व्यक्तींचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जिथं प्रत्येकाजवळ साप दिसतो आहे.

साप हा प्राणी असा आहे, ज्याला साहजिकच मोठ्या व्यक्तीही घाबरणार. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्याकडे साप दिसतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला काही व्यक्ती आपल्या हातात साप धरून दिसतात. पण जसजसं आपण व्हिडीओच्या पुढे जातो तसतसं धक्काच बसतो. कारण असे साप फक्त काही मोजक्याच लोकांकडे नाहीत. तर किती तरी लोकांकडे आहेत.

हे वाचा - VIDEO : गजराजाला आला राग; हत्तीने शेपटी धरून मगरीला पाण्यातच आपट आपट आपटलं

कुणी सापाला हातात धरलं आहे. कुणी त्याला गळ्यात घातलं आहे. कुणी साप हातात धरून त्याच्यासोबत खेळत चालत आहे. अगदी लहान मुलंही या जमावात दिसत आहे. त्या मुलांनीही बिनधास्तपणे आपल्या हातात, गळ्यात साप टाकले. साप घेऊन हे सर्वजण रस्त्यात चालत आहेत. जणू ही साप पकडणाऱ्यांची पदयात्राच असावी असंच हा व्हिडीओ पाहून वाटतं.

हे वाचा - Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी सुद्धाही साप पकडणाऱ्यांची यात्रा आहे का? असं विचारलं आहे. हे दृश्य कुठलं आहे आणि यामागे काय कारण आहे? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? मग आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Snake, Snake video