Home /News /viral /

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा Game over; मित्राने सर्वांसमोरच दिलं असं Wedding gift

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा Game over; मित्राने सर्वांसमोरच दिलं असं Wedding gift

गिफ्ट पाहून नवरा-नवरीला आवरलं नाही हसू.

गिफ्ट पाहून नवरा-नवरीला आवरलं नाही हसू.

नवरदेवाच्या मित्राने नवरा-नवरीला (Bride groom video) दिलेल्या गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

  मुंबई, 07 ऑगस्ट : लग्न (Wedding Video)  ठरताच मित्रमैत्रिणी थट्टा करण्याची एक संधी सोडत नाही. लग्नात तर ते काय करतील याचा नेम नाही. त्यापैकीच एक म्हणजे त्यांच्याकडून मिळणारी विचित्र लग्नाची भेट (Weird Wedding Gift). अशाच नवरदेवाच्या एका मित्राने नवरा-नवरीला (Bride groom video) दिलेल्या गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral video) होतो आहे. लग्नात नवरा-नवरीला  आशीर्वादासह गिफ्टही  (Wedding gift) मिळतात. कुणी पैशांचा आहेर करतं, कुणी सुंदर असं शोपीस देतं, कुणी घरातील आवश्यक वस्तू देतं. पण आता मात्र लग्नात कोण लग्नामध्ये कोण काय गिफ्ट करेल  हे सांगू शकत नाही. विशेषतः नवरदेवाचे मित्र. अशाच नवरदेवाच्या एका मित्राने काय गिफ्ट दिलं आहे ते पाहा.
  व्हिडीओत पाहू शकता. हा तरुण नवरा-नवरी दोघांनाही गिफ्ट देतो. त्यांच्या हातात ते गिफ्ट ठेवतं. गिफ्टचा आकार पाहतात त्यात एखादी फोटो फ्रेम वगैरे असं काहीतरी असावं असंच वाटतं. नवरा-नवरी दोघंही गिफ्ट ओपन करतात तेव्हा त्यांना ते पाहून हसून आवरत नाही. हे वाचा - नवरा-नवरीचं लग्नात हे चाललंय तरी काय? VIDEO पाहून व्हाल हैराण हे गिफ्ट म्हणजे पाटी आहे आणि त्यावर जे लिहिलं आहे ते मजेशीर आहे. व्हिडीओत दोघंही आपली पाटी दाखवतात. नवरीच्या पाटीवर लिहिलं आहे, गेम स्टार्ट आणि नवरदेवाच्या पार्टीवर गेम एंड.  एरवी तुम्ही प्री-वेडिंग शूटमध्ये अशी नवरा-नवरीच्या हातात अशी मजेशीर पाटी पाहिली असेल. हीच पाटी त्याच्या मित्रांनी मात्र त्याच्या लग्नातच दिली आहे. हे गिफ्ट पाहिल्यानंतर नवरा थोडा घाबरला आहे पण नवरीला मात्र चांगलाच आनंद झाला आहे. ती खळखळून हसताना दिसते आहे. हे वाचा - ...अन् लग्न मंडपात नवरदेवाला कोसळलं रडू; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं निरंजन मोहपात्रा इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या