कोलकाता, 16 डिसेंबर : कोलकाता शहरात आकाशामध्ये एक प्रकाशाचा बिंदू दिसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अचानकपणे हा प्रकाशाचा बिंदू दिसला त्यामुळे हे नेमकं आहे तरी काय, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. कोलकाता शहरामध्ये गुरुवारी रात्री अजब घटना घडल्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. जवळपास 5 मिनिट हा प्रकाश बिंदू दिसला होता. शहरामध्ये संध्याकाळी 5.50 ते 5.55 पर्यंत हा प्रकाशाचा बिंदू पाहण्यास मिळाला.
कोलकाता शहरामध्ये आकाशात प्रकाश बिंदू दिसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण pic.twitter.com/Klv7k7jx9C
— News18Lokmat (@News18lokmat) December 16, 2022
एखाद्या विमानाच्या लाईटचा उजेड पडावा असा हा प्रकाशाचा बिंदू दूरपर्यंत दिसत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (खोडकर माकडाची भलतीच डेअरिंग; चक्क सिंहाच्या पाठीवर बसलं; पुढे काय घडलं पाहा Video) हा प्रकाशाचा बिंदू कुठून आला आणि कसा आला याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. हा प्रकाशाचा बिंदू नेमका काय होता, ही कुठळी वस्तू होती की आणखी काही याबद्दल माहिती मिळू शकली नाही. (तोडल्यावर चक्क माणसासारखं येतं रक्त! अजब आहे या झाडाची किमया) अंतराळ संशोधकांचं म्हणणं आहे की, ही वस्तू उल्का असू शकते किंवा एखादा लघूग्रह असू शकतो. एखादी मिसाइल सुद्धा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलकाता शहराव्यतिरिक्त बांकुरा, पूर्व आणि पश्चिम मिदनापुर, उत्तर आणि दक्षिण 24 परगना, हावड़ा, हुगली आणि ओडिशा या शहरातही हे पाहण्यास मिळालं. याबद्दल वेगवेगळे तर्क लढवले जात आहे.