मुंबई, 16 डिसेंबर : सिंहाला जंगलाचा राजा मानलं जातं. त्याची ताकद व चपळता यांमुळे त्याला तो दर्जा दिला जातो. कसलीही भीती न बाळगता हा प्राणी रुबाबात जंगलात वावरतो. जंगलातले इतर प्राणी त्याच्या जवळही फिरकत नाहीत. आपल्या ताकदीच्या व चपळतेच्या बळावर सिंह आपली शिकार पकडतो. माकड फार खोडकर असतं. सतत काही ना काही खोड्या केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आता हे दोन प्राणी समोरासमोर आल्यावर काय होईल बरं? अशा दोन प्राण्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून विश्वासही बसणार नाही, की असंही कुठे तरी होऊ शकेल. हा व्हिडिओ डॉ. विवेक बिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे व “काही तरी करण्याची इच्छाशक्ती तुम्हाला सिंहावर स्वार करू शकते” अशी कॅप्शन त्याला दिली आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतं, की एक माकड चक्क सिंहाच्या पाठीवर बसलं आहे. सिंह जंगलात रुबाबात फिरत आहे. त्या फिरणाऱ्या सिंहावर माकडाची नजर जाते व माकड त्याच्या पाठीवर उडी मारतं. विशेष म्हणजे सिंह काहीही प्रतिसाद न देता चालत राहतो. मग काय माकड मस्त आरामात बसतं आणि सिंहावर बसून ऐटीत स्वारी करतं. हे पाहून असं वाटतं जणू माकड हाच जंगलाचा राजा असून, सिंह हा माकडाचा नोकर आहे. सिंह व माकडाच्या या व्हिडिओमध्ये जो प्रसंग चित्रित झाला आहे, तसं सहसा घडत नाही. सिंहाच्या पाठीवर बसण्यासाठी किती धाडस असावं लागेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. त्यामुळे माकडाचं धाडस कौतुकास्पद आहे. माकडाच्या या धाडसाची सोशल मीडिया युझर्सकडून खूप प्रशंसा होत आहे.
कुछ कर गुजरने का जज्बा आपको शेर की सवारी भी करवा सकता है 😂#ViralVideo #ViralPost pic.twitter.com/dayEtINC3E
— Dr. Vivek Bindra (@DrVivekBindra) December 7, 2022
दुसरीकडे, कोणालाही आपल्या जवळ न येऊ देणारा सिंह, आपल्या पाठीवर चक्क माकडाला बसू देतोय. हे सिंहाचं वर्तनदेखील अविश्वसनीय आहे. तीक्ष्ण नजर, चपळता व प्रचंड ताकदीच्या जोरावर सिंह आपली शिकार सहज टिपतो; पण आपल्या पाठीवर बसलेल्या माकडाला सिंह काहीही करत नाही. त्याचं अशा प्रकारचं वागणं हे एक कोडं असल्यासारखं वाटतं आहे. यावरही अनेक युझर्स सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.