पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकमुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात, पाहा हा VIDEO

पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकमुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात, पाहा हा VIDEO

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानीवडे टोल नाका इथं शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.

  • Share this:

 मुंबई, 19 जुलै :  मुंबई- अहमदाबाद महामार्ग टोल नाक्या जवळील ब्रिजवर पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकमुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानीवडे टोल नाका इथं शनिवारी संध्याकाळी  ही घटना घडली. पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकला मागून एका ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, पंक्चर काढण्यासाठी ट्रकला जॅकवर उभं करण्यात आलं होतं.

धडकेतनंतर ट्रक जॅकवरून निघाला आणि समोरून येणाऱ्या मारुती सुझुकीच्या एर्टिगा कारवर धडकला. या धडकेत एर्टिगा गाडी दोनदा पलटी झाली. मात्र सुदैवाने या गाडीतील चालक बचावला आहे.

लॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा

या  विचित्र अपघातात पंक्चर काढणाऱ्या राजेश खर्डे या चालक चिरडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच  त्याचा मृत्यू  झाला तर धडक दिलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

या अपघातात  दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Published by: sachin Salve
First published: July 19, 2020, 8:52 AM IST

ताज्या बातम्या