नवी दिल्ली 24 जुलै : उंदीर (Mouse) हा खरं तर एवढासा प्राणी; पण अनेकांना त्याची भीती वाटते. हा एवढासा प्राणी अनेकांना पळता भुई थोडी करतो. या एवढ्याशा प्राण्यानं नुकतीच एका देशाच्या संसदेत (Parliament) खळबळ माजवल्याचं समोर आलं आहे. देशाचा कारभार जिथून चालतो त्या संसदेत अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. कोणालाही ही सुरक्षा व्यवस्था भेदणं सहजासहजी शक्य नसतं; पण स्पेनच्या संसदेत (Spain Parliament) एका उंदरानं हा कारनामा करून दाखवला आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. स्पेनच्या संसदेत कामकाज सुरू असताना एक उंदीर घुसला आणि त्याने तिथे एकच गोंधळ घातला. उंदराला बघून सदस्यांनी घाबरून काम सोडून पळायला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. VIDEO: अरे हे काय! लग्नासाठीही सुट्टी नाही; मंडपातच नवरदेवाचं Work From Wedding स्पेनमधल्या सेविले इथल्या अंडालुसिया संसदेत (Parliament of Andalusia) ही घटना घडली. ही स्पेनमधली स्वायत्तता लाभलेली संसद आहे. अंडालुसिया संसदेनं 1982 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या संसदेत डी होंड सिस्टीमद्वारे 109 सदस्य निवडले जातात. सध्या इथं पीपल्स पार्टी ऑफ अंडालुसिया आणि स्यूदादानोस यांच्या आघाडीचं सरकार आहे. या संसदेत गुरुवारी (22 July) प्रेसिडेंट मार्था बॉस्केट (Marta Bosquet) एका महत्त्वाच्या विषयावर बोलत होत्या. अचानक समोर त्यांना एक उंदीर दिसला. उंदीर दिसताक्षणी त्या घाबरून जोरात किंचाळल्या. त्यांचं किंचाळणं ऐकून आणि उंदीर शिरल्याचं लक्षात येताच सर्व सदस्य आपली जागा सोडून धावू लागले. ओरडू लागले. सगळीकडे एकच गोंधळ माजला.
This is the moment when a rat causes havoc in Andalusia's parliament in Spain 🐀 pic.twitter.com/PypFRWvQfQ
— Reuters (@Reuters) July 21, 2021
Bungee Jumping ची हौस जीवावर बेतली; एक चूक अन् हवेतच झाला तरुणीचा मृत्यू त्यावेळी सदनात एका महत्त्वाच्या विषयावर मतदान होणार होतं. माजी रीजनल प्रेसिडेंट सुझान डियाज यांना सिनेटर म्हणून नियुक्त करावं की नाही यावर सदस्य मतदान करणार होते; पण त्यापूर्वीच या उंदरानं प्रवेश करून एकच गोंधळ उडवून दिला. नंतर सदनाचं व्यवस्थापन बघणाऱ्या कंपनीच्या लोकांनी या उंदराला पिंजऱ्यात पकडलं आणि हा गोंधळ संपला. वातावरण शांत झाल्यानंतर सर्व सदस्य पुन्हा आपल्या जागेवर स्थानापन्न झाले आणि कामकाज पुढं सुरू झालं. सुझान डियाज यांच्या सिनेटरपदाच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर सदस्यांनी मतदान केलं आणि त्यात सुझान डियाज यांची समाजवादी सिनेटर म्हणून नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब झालं.