नवी दिल्ली 12 जानेवारी : अनेकदा लोकांना अॅडवेंचरची इतकी आवड असते की ते जीवाला धोका असतानाही न घाबरता काहीतरी करायला जातात. अनेक पराक्रम ते सहज करतात. भीतीसमोर विजय असतो हे खरं, पण भीती आणि विजय यांच्यामध्ये मृत्यूही असू शकतो, जो समोर उभा राहिल्यावर लोकांच्या लक्षात येतो. असंच काहीसं नुकतंच एका गिर्यारोहकासोबत घडलं, जेव्हा त्याने बर्फाळ पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न सुरू केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बरमोडा घालून चोरी करणं पडलं महागात, अखेर बाटलीसह फुटला भांडा, चोरीचा Video Viral @wpeoplesurvive या ट्विटर अकाऊंटवर असे व्हिडिओ अनेकदा पोस्ट केले जातात ज्यामध्ये लोक मृत्यूच्या दारातून परत आल्याचे दिसतात. अलीकडेच या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक गिर्यारोहक बर्फाळ पर्वत चढण्याचा प्रयत्न करत आहे. बर्फाच्या डोंगरावर चढणं सामान्य पर्वत चढण्यापेक्षा जास्त कठीण आहे. कारण खडकाळ पर्वत पकडणं सोपं असतं, परंतु बर्फ घसरतो, त्यामुळे तिथे पकड मजबूत होत नाही. याचंच उदाहरण या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
solo ice climber almost falls to his death pic.twitter.com/mAy16FYAAN
— Watch People Survive (@wpeoplesurvive) January 10, 2023
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बर्फाळ डोंगरावर चढताना दिसत आहे. त्याच्या शूजमध्ये क्रॅम्पन्स देखील आहेत. ही धारदार उपकरणं शूजमध्ये लावली जातात, ज्यामुळे शूज सहजपणे बर्फात अडकतात आणि गिर्यारोहक सहजपणे वर चढू शकतात. हा व्यक्ती आपल्या हातातील एक उपकरण आणि बुटांनी पकड मजबूत करतो, पण अचानक त्याची पकड सुटते आणि तो खाली कोसळू लागतो.
यानंतर गिर्यारोहक अतिशय सावधपणे लगेचच हातातील उपकरणाचा वापर करून स्वतःला घसरण्यापासून वाचवतो. त्यामुळे त्याचा जीव वाचतो. तो वेगाने श्वास घेण्यास सुरुवात करतो, ज्यावरून समजतं की तो खूप घाबरला आहे. Thane Bus Accident : अंगावर शहारे आणणारा VIDEO, महिलेच्या अंगावरून गेली बस, ठाण्यातील घटना या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने सांगितलं की, जर तुम्हाला डोंगरावरून पडण्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही त्यावर अजिबात चढू नका. आणखी एकाने म्हटलं, की लोकांना अशी रिस्क घ्यायला आवडते, म्हणूनच ते गिर्यारोहण करतात. एकाने म्हटलं, की त्या व्यक्तीकडे चांगला आरोग्य विमा असणं आवश्यक आहे.