अजित मांढरे (ठाणे), 11 जानेवारी : ठाणे शहरात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे शहराअंतर्गत असणाऱ्या महानगरपालिकेच्या बसने एका महिलेला धडक दिली. दरम्यान धडक दिलेल्या बसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा आहे. एक महिला रस्ता ओलांडत असताना त्या महिलेच्या अंगावरून ती बस गेल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
ठाणे शहरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. टीएमटीने बसने महिलेला धडक दिल्याची घटना आज (दि.11) जानेवारीला घडली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या सीसीटीव्हीमध्ये एकूण तीन महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. पहिली महिला सुरक्षित रित्या रस्ता ओलांडते. यानंतर एकापाठोपाठ दोन महिला रस्ता ओलांडताना दिसत आहेत.
ठाण्यातील घटना, TMT बसने महिलेला दिली धडक pic.twitter.com/74LZeN9aJZ
— News18Lokmat (@News18lokmat) January 11, 2023
हे ही वाचा : आमदार बच्चू कडू पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना
दरम्यान रस्त्याच्या कडेला उकरलेले असल्याने त्या दोन महिला समोरून बस येत असल्याचे दिसताच रस्त्याच्या कडेला थांबतात यावेळी एक महिला थोडी पुढे तर एक महिला मागे थांबली होती. यावेळी अचानक बसने साईडला वळन घेत असताना ड्रायव्हरला अंदाज न आल्याने बस थेट महिलेला धडकली यावेळी ती महिला बस खाली पडल्याने तिच्या पायावरून बस गेली. या दरम्यान महिलेचा पाय बस खाली चिरडल्याने तिचा पाय तुटला आहे. ही घटना बस ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांच्या वाहनाने मारल्या तीन पलट्या
मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जातांना ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांच्या वाहनाचा वेग असल्याने वाहनाने तीन पलट्या मारल्या माहिती आहे. तर हा अपघात तिहेरी असल्याची माहिती माहिती समोर आली आहे. यामध्ये तिसरे वाहन अपघात होताच तातडीने पसार झाले आहे.
हे ही वाचा : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, धमक्या देत हजारोंचा चुनाही लावला, गोंदियातून तोतयाला अटक
या घटनेत नाशिक शहर दलाचे 3 पोलीस जखमी झाले आहेत. संतोष भगवान सौंदाणे (वय 57), सचिन परमेश्वर सुक्ले (वय 43), रविंद्र नारायन चौधरी (वय 37) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. दरम्यान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल होऊन जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video, Live video viral, Social media viral, Thane, Thane (City/Town/Village)