जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बरमोडा घालून चोरी करणं पडलं महागात, अखेर बाटलीसह फुटला भांडा, चोरीचा Video Viral

बरमोडा घालून चोरी करणं पडलं महागात, अखेर बाटलीसह फुटला भांडा, चोरीचा Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमधील चोर खरंतर चोरी करताना जुगाडचा वापर करतो, तो फसतो आणि त्याचं भांड फुटतं…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 11 जानेवारी : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ समोर येईल याचा काही नेम नाही. इथे दररोज इतके मनोरंजक आणि अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात की ते आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चोरीचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक चोर चोरी करताना अशी चुक करुन बसतो की त्याचं भांड फुटतं. या व्हायरल व्हिडीओमधील चोर खरंतर चोरी करताना जुगाडचा वापर करतो, तो फसतो आणि त्याचं भांड फुटतं… नुसतंच भांड फुटत नाही तर त्याने चोरी केलेली बॉटल फुटते आणि तो त्याामुळे पडतो देखील, ज्यामुळे त्याला दुखापत होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे ही पाहा : फोन चोरुन पळाला चोर, मग काय फिल्मी स्टाईलमध्ये लोकांनी असं काही धुतलं की बस्स… पाहा Video या व्हायरल व्हिडीओमध्ये चोर बरमोडा किंवा हाफ पॅन्ट वरती सुपरमार्केटमध्ये जातो. या मार्केटमध्ये दारुच्या बाटल्या देखील विकायला आहेत. तेव्हा हा चोर या मधील एक बाटली उचलतो आणि ती आपल्या बरमोडामध्ये ठेवतो. पण ही बाटली जड असल्यामुळे ती खाली पडते आणि फुटते देखील. सहाजीकच या चोराचा जुगाड फसला होता. त्याने बाटली खाली पडल्यावर आजूबाजूला पाहिले आणि ती बाटली पटकन पायाने रॅक खाली टाकली. पण बाटली फुटल्याने दारु सगळीकडे झाली होती. तेव्हा घाई करताना या चोराचा पाय सरकला आणि तो धपकन खाली पडला.

जाहिरात

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. चोराची जी काही हालत या व्हिडीओमध्ये होते, ते पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की हे तर कर्माचं फळ आहे.

News18लोकमत
News18लोकमत

खरंतर ही चोरी करण्यासाठी दोन तरुण तेथे आले असतात. एक तरुण अवतीभोवती लक्ष ठेवून असतो, तर दुसरा चोर ही बाटली चोरी करण्याच्या प्रयत्नात असतो. हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात