नवी दिल्ली 07 नोव्हेंबर : एका आईपासून तिच्या बाळाला वेगळं करणं कोणालाही शक्य नाही. मग समोर यमराजही उभा असला तरीही काही फरक पडत नाही. आपल्या बाळाला संकटापासून वाचवण्यासाठी एखादी आई काहीही करू शकते. ही बाब प्राण्यांबाबत असो किंवा माणसांबाबत, आई ती आईच असते. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल **(Viral Video of Wild Animals)**होत आहे. यात दिसतं, की सिंहिण झेब्र्याच्या पिल्लाला पकडते. मात्र, आपल्या पिल्लाला अडचणीत पाहून त्याची आई सिंहिणीसोबत भिडते (Video of Zebra and Lioness Fight). शेजारच्या कुत्र्याला Kiss करण्यासाठी खाली वाकली महिला; डॉगने केली भयावह अवस्था आई केवळ ममतेचं उदाहरण नाही तर शूरता आणि धाडसाचं दुसरं नावही आहे. याच कारणामुळे आईशिवाय तिच्या बाळाची कोणीच रक्षा करू शकत नाही. मग तो प्राणी असो किंवा माणूस. सध्या जंगल सफारीदरम्यान एका पर्यटकाने शूट केलेला असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मादा झेब्रा आणि तिचं पिल्ली जंगलात धावताना दिसतात. इतक्यात एक सिहिंण झेब्राच्या पिल्लावर हल्ला करते आणि त्याला आपल्या जबड्यात पकडते. हे पाहून मादा झेब्रा सिंहिणीसोबत भिडते आणि आपल्या पिल्लाला मृत्यूच्या तोंडातून परत आणते.
24 सेकंदाचा हा व्हिडिओ nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 4 दिवसाआधी शेअ झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 30 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. यूजरनं हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, की एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. या दाम्पत्याची अन् चिमणीची अनोखी मैत्री, राहणं-खाणं नाही तर कारमधूनही फिरते हा व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, आई आईच असते. मग ती प्राण्याची असो किंवा माणसाची. एक आईपासून तिच्या बाळाला कोणीच वेगळं करू शकत नाही. इतरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.