मराठी बातम्या /बातम्या /विदेश /So Cute : या दाम्पत्याची अन् चिमणीची आहे अनोखी मैत्री, राहणं-खाणं नाही तर कारमधूनही फिरते

So Cute : या दाम्पत्याची अन् चिमणीची आहे अनोखी मैत्री, राहणं-खाणं नाही तर कारमधूनही फिरते

So Cute : या दाम्पत्याची अन् चिमणीची आहे अनोखी मैत्री, राहणं-खाणं नाही तर कारमधूनही फिरते

So Cute : या दाम्पत्याची अन् चिमणीची आहे अनोखी मैत्री, राहणं-खाणं नाही तर कारमधूनही फिरते

एकूणच प्राणी असो किंवा पक्षी, तुम्ही जर त्यांना जीव लावला, त्यांची काळजी घेतली तर त्यांनाही ते प्रेम कळतं.

    नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : माणसाचा सगळ्यांत जवळचे आणि चांगले मित्र प्राणीच असतात असं म्हटलं जातं. कारण प्राण्यांच्या मनात कोणतंही कपट नसतं किंवा त्यांना कोणतीही लालसा नसते. प्राण्यांच्या आणि माणसांच्या मैत्रीचे अनेक किस्से आतापर्यंत आपण ऐकले असतील. आता आम्ही तुम्हाला जो किस्सा सांगणार आहोत तोही अशाच अनोख्या मैत्रीचा किस्सा आहे. हा मैत्रीचा किस्सा स्लोव्हेनियामधील एक दाम्पत्य आणि त्यांच्या पाळीव चिमणीचा (Pet Sparrow) आहे. या दोघांच्या एकमेकांवरच्या प्रेमानं लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या दोघांमध्ये मैत्री कशी झाली हेही ऐकण्यासारखं आहे.

    स्लोव्हेनियामधील कूपर शहरात राहणाऱ्या एलिश (Elish) आणि जांजा (Janja) यांनी त्यांच्या पाळीव चिमणीला म्हणजे चिबीला (Chibi) ती अगदी 10 दिवसांची असताना दत्तक घेतलं होतं. मे 2020 मध्ये जन्म झालेली चिबी मादी चिमणी आहे. एलिश आणि जांजाची मैत्रीण बाहेर जात असताना तिला चिमणीचं एक छोटंसं पिल्लू रस्त्यावर पडलेलं दिसलं. या पिलाच्या आसपास तिची आई दिसत नव्हती. त्यानंतर ही मैत्रीण या पिलाला तिच्या घरी घेऊन गेली. पण तिच्या घरी तिचं स्वत:चं बाळ होतं. त्यामुळे या चिमणीच्या पिलाला ती सांभाळू शकणार नव्हती. त्यानंतर त्या मैत्रीणीनं एलिश आणि जांजाशी संपर्क साधला. या दोघांनी चिमणीच्या या पिलाला दत्तकच घेण्याचा निर्णय घेतला.

    वाचा : उतावळा नवरदेव! स्टेजवरच आऊट ऑफ कंट्रोल झाला वर; ते कृत्य पाहून नवरीही लाजली, VIDEO

    चिबी जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा खूप अशक्त होती. तिला दर अर्ध्या तासानं खायला घालायला लागायचं. चिबी जगेल असं एलिश आणि जांजा दोघांनाही वाटत नव्हतं. पण चिबीची तब्येत काही दिवसांत सुधारली आणि थोडी मोठी झाल्यावर ती उडायलाही शिकली. आता चिमणीला तर आपण कायम घरात ठेवू शकत नाही, ही गोष्ट या दोघांनाही माहिती होती. त्यामुळे त्यांनी तिला मुक्त सोडण्याचं ठरवलं. हे दोघं तिला उडण्यासाठी म्हणून घराबाहेर घेऊन गेले तेव्हा चिबी थोडा वेळ मोकळ्या आकाशात उडाली पण नंतर ती परत आली आणि त्यानंतर ती पुन्हा कधीही या दोघांना सोडून गेली नाही. आताही चिबी कायम या दोघांसोबतच राहते. त्यांच्याबरोबर फिरायला जाते, कारमधून प्रवासाला जाते. जणू ती त्यांच्या घरातलीच एक सदस्य आहे.

    वाचा : बायकोनं पतीला अक्षरशः कुत्रा बनवलं; गळ्यात पट्टा घालून गावभर फिरवलं, कारण वाचून लावाल डोक्याला हात

    जेव्हा 11 तासांसाठी चिबी झाली होती गायब

    फक्त झोपण्याच्या वेळपुरती चिबी एकटी राहते. बाकी सगळावेळ ती या जोडप्याच्या पुढेमागेच उडत असते. कधीकधी ती घराबाहेरही उडण्यासाठी जाते पण काही वेळाने परत येते. तिचा पिंजराही कायम उघडाच असतो. एकदा चिबी दुसऱ्या एका चिमणीच्या मागे उडत गेली होती. त्यानंतर ती 11 तास झाले तरी परत आली नाही. तेव्हा मात्र या दोघांचा जीव टांगणीला लागला होता. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा घराजवळ असलेल्या एका व्यक्तीच्या खांद्यावर बसून चिबी काहीतरी खात होती. त्यांनतर आता जेव्हा चिबी जर खूप वेळ गायब झाली तर हे दोघंजण आधी आजूबाजूच्या लोकांकडे तिचा शोध घेतात.

    एकूणच प्राणी असो किंवा पक्षी, तुम्ही जर त्यांना जीव लावला, त्यांची काळजी घेतली तर त्यांनाही ते प्रेम कळतं. ते लक्षात ठेवतात आणि तुमच्यावरही तसंच निरपेक्ष प्रेम करतात. माणूस माणसाचा शत्रू होतो पण जीव लावलेले प्राणी मात्र प्रेमाची परतफेड प्रेमानेच करतात.

    First published:

    Tags: Friendship, Viral