जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! उंची वाढण्यासाठी आईकडून मुलीचा भयानक छळ; चिमुकलीला दिली आयुष्यभराची शिक्षा

Shocking! उंची वाढण्यासाठी आईकडून मुलीचा भयानक छळ; चिमुकलीला दिली आयुष्यभराची शिक्षा

 पीडित चिमुरडीच्या घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेल 23 वर्षीय तरुणाने हे कृत्य केले आहे.

पीडित चिमुरडीच्या घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेल 23 वर्षीय तरुणाने हे कृत्य केले आहे.

ही महिला आपल्या मुलीची उंची (Height) वाढावी यासाठी तिला इतका व्यायाम (Exercise) करायला लावत असे की आपल्या मुलीला याचा काय त्रास होऊ शकतो याचा विचारही तिनं केला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 15 सप्टेंबर : उंची वाढवण्यासाठी एका आईनं आपल्या मुलीचा इतका छळ केला की तिचे गुडघे खराब झाले. ही महिला आपल्या मुलीची उंची (Height) वाढावी यासाठी तिला इतका व्यायाम (Exercise) करायला लावत असे की आपल्या मुलीला याचा काय त्रास होऊ शकतो याचा विचारही तिनं केला नाही. ही विचित्र घटना चीनच्या (China) जेनजियांग (Zhejiang) येथून समोर आली आहे. थेट सफारी गाडीवरच चढला चित्ता आणि…; नॅशनल पार्कमधील धडकी भरवणारा VIDEO VIRAL जेनजियांग येथील हँगझोऊ (Hangzhou) येथे राहणारी महिला आपल्या 13 वर्षीय मुलीला दिवसात 3000 दोरउड्या घ्यायला भाग पाडत असे. मुलीनं अनेकदा आईकडे तक्रार केली की जास्त दोरउड्यांमुळे तिच्या पायांमध्ये प्रचंड वेदना होत आहेत. मात्र, आईला काहीही करून आपल्या मुलीची उंची वाढवायची होती. त्यामुळे तिनं काहीच ऐकलं नाही आणि तिनं आपल्या मुलीला तोपर्यंत हे सगळं करायला लावलं जोपर्यंत चिमुकलीच्या गुडघ्यांची काम करणंच बंद केलं नाही. विशेष बाब म्हणजे उंची वाढवण्यासाठी महिलेनं कोणत्या डॉक्टरांचा सल्लाही घेतला नाही. तिनं ऐकलेल्या माहितीवरच मुलीला दोरउड्या घेण्यास भाग पाडलं. सुरुवातीला तिनं मुलीला 1000 वेळा दोरउड्या घेण्यास सांगितलं. मात्र, नंतर हा आकडा 3000 वर पोहोचला. व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी! चक्क बाईकची कार बनवली; तरुणाने काय केला जुगाड पाहा VIDEO आईनं मुलीसोबत सलग 3 महिने हे कृत्य केलं. यानंतर मुलीचे गुडघे खूप जास्त दुखू लागल्यानं तिनं मुलीला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, की मुलीला ट्रॅक्शन अॅपोफिसिटिस (Traction Apophysitis) झालं आहे. आता या महिलेजवळ पश्चातापाशिवाय काहीच उरलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात