Home /News /viral /

व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी! चक्क बाईकची कार बनवली; तरुणाने काय केला जुगाड पाहा VIDEO

व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी! चक्क बाईकची कार बनवली; तरुणाने काय केला जुगाड पाहा VIDEO

बाईकवरच तरुणाने लुटला कार चालवण्याचा आनंद.

  मुंबई, 14 सप्टेंबर : किती तरी जणांना गाड्यांची आवड असते. कुणाला बाईक (Bike) आवडते, कुणाला कार (Car). कुणाला दोन्ही आवडतात. पण बजेटमुळे कार खरेदी करणं शक्य होत नाही. मग बाईकवरच समाधान मानावं लागते. पण एका तरुणाने मात्र असा जुगाड केला त्याने चक्क आपली बाईकच कारमध्ये बदलली आहे (Bike converted into car). बाईकची कार बनवण्यासाठी तरुणाने जो जुगाड केला तो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. जुगाडाचा हा व्हिडीओ (Jugaad video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जो पाहून तरुणाच्या कौतुकासाठी  व्वा रे पठ्ठ्या, व्वा काय जुगाड आहे, वॉट अॅन आयडिया सरजी असे शब्द तुमच्या तोंडातून आल्याशिवाय राहणार नाहीत.
  जगात टॅलेंटची कमी नाही आहे. किती तरी लोक जुगाड करून असं काहीतरी करतात ही बडे बडेही त्यांच्या या जुगाडामुळे इम्प्रेस होतात, त्यांचे फॅन होतात. हे वाचा - बापरे! हे काय आहे? कारमधील कचऱ्यात दिसलं असं काही की पाहूनच फुटेल घाम आता हा व्हिडीओ पाहा. यामध्ये तरुणाने आपल्या बाईकचे हँडल काढले आहेत आणि त्याजागी त्याने बाईकवर स्टिअरिंग लावलं आहे, जे कारमध्ये असतं. बाईक हँडल धरून नव्हे तर चक्क स्टिअरिंग फिरवून तो चालवताना दिसतो आहे. अगदी मजेत तो आपली बाईक चालवतो आहे. बाईकवरही तो कार चालवण्याचा आनंद लुटताना दिसतो आहे. हे वाचा - मंडपात नवरीबाईला लागली गाढ झोप, नवरदेवाजवळ येत अखेर मैत्रिणीनेच...; VIDEO VIRAL तरुणाने बाईकसोबत असं काही केलं आहे, जे मजेशीर आहे. पाहताच तुम्हाला हसू येईल. पण तरुणाच्या टॅलेंटला दाद द्यायलाच हवी. end_gallbaat1 इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bike riding, Car, Vehicles, Viral, Viral videos

  पुढील बातम्या