नवी दिल्ली 15 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ क्लिप व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळतं, की कशाप्रकारे एक महिला आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिला इमारतीवरून खाली टाकते (Mother Throws Daughter From Burning Building). ती महिला ज्या इमारतीवर उभा आहे, तिथे आग लागलेली आहे. खाली उभा असलेले लोक एकत्र येऊन या चिमुकल्या बाळाचा जीव वाचवतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे खाली उभा असलेल्या लोकांनी या चिमुकलीला काहीही होऊ दिलं नाही. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील आहे. अरे बापरे! सिंहासमोर स्वतःच गेला; पुढे जे घडलं ते VIDEO पाहून विश्वास बसणार नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला ज्या इमारतीवर उभा आहे तिला आग लागलेली आहे. ही महिला जोरजोरानं ओरडत आहे. हि महिला आपल्या बाळासोबत आगीच्या विळख्यात अडकल्याचं दिसतं. आपल्या बाळाच्या जीवाला धोका असल्याचं समजल्यानं काय करावं हे तिला कळत नाहीये. यानंतर ती आपल्या मुलीला इमारतीवरून खाली फेकते. खाली असलेल्या लोकांनी एकत्र जमा होत या चिमुकलीला वाचवलं.
We need heroes not people that are going to encourage you to loot on a big platform like Instagram! A building set alight by protestors with people inside, a mother had to throw her baby off a roof luckily strangers were there to save the day. #SouthAfrica pic.twitter.com/8TGuUmE89r
— Afrivue.Com - Merging The Content-nent (@Afrivue) July 13, 2021
VIDEO: ..अन् मंडपातच गाढ झोपला नवरदेव; नवरीची प्रतिक्रिया पाहून नाही आवरणार हसू या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांना भीतीही वाटली. एका यूजरनं लिहिलं, की खरंच हा व्हिडिओ भयंकर आहे, मात्र बरं झालं की खाली उभा असलेल्या लोकांनी मुलीला वाचवलं. यातील महिला मनयोनी हिनं सांगितलं, की मी खूप घाबरले होते. मात्र, खाली रस्त्यावर काही लोक होते. हे लोक जोरानं ओरडत होते, की बाळाला खाली फेक. मात्र, माझ्या बाळाला माझ्यापासून दूर पाठवण्यासाठी माझा कोणावरही विश्वास नव्हता. महिलेनं सांगितलं, की घटनेत तिच्या बाळाला काहीही दुखापत झाली नाही. बाळाला महिलेनं खाली फेकल्यानंतर काही वेळासाठी ती प्रचंड घाबरली होती, की खालचे लोक माझ्या बाळाला व्यवस्थित पकडतील का. बाळाच्या आईनं म्हटलं, की माझ्यासाठी ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती की काहीही करून ती सुरक्षित राहावी. आता या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

)







