मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! सिंहासमोर स्वतःच गेला आणि व्यक्तीसोबत पुढे जे घडलं ते VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

अरे बापरे! सिंहासमोर स्वतःच गेला आणि व्यक्तीसोबत पुढे जे घडलं ते VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

सिंहांच्या जवळ जाण्याची हिंमत या व्यक्तीने केली आणि...

सिंहांच्या जवळ जाण्याची हिंमत या व्यक्तीने केली आणि...

सिंहांच्या जवळ जाण्याची हिंमत या व्यक्तीने केली आणि...

  • Published by:  Priya Lad
केपटाऊन, 15 जुलै: आपल्याला एकदा तरी सिंहाचं (Lion) दर्शन व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी जंगल सफारी किंवा नॅशनल पार्कमध्ये जाऊन आपण सिंहांना (Lion video) पाहतो. पण सिंहांच्या जवळ जाण्याची हिंमत मात्र आपली होत नाही. पण एक व्यक्ती मात्र भल्यामोठ्या सिंहांसमोर (Man with lions) स्वतःच गेला. तुम्हाला फक्त वाचूनच घाम फुटला ना? खरंतर विश्वासही बसणार नाही. चक्क सिंहासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये ही व्यक्ती सिंहाजवळ जाऊन त्याच्यासमोर हात करतो आणि सिंह धावत येतो. तेव्हा काळजाचा ठोकाच चुकतो. आता या व्यक्तीचं काही खरं नाही असंच काहीच क्षण वाटतं. पण घडतं उलटंच.
व्यक्तीने हात दाखवून बोलवताच सिंह धावत येतो आणि या व्यक्तीला मिठीच मारतो आणि त्याला प्रेमाने गोंजारतो. जसं एखादं मांजर, कुत्रा असावा तसाच हा सिंह या व्यक्तीसोबत मस्ती करताना दिसतो. म्हणजे काय तर एक सिंह या व्यक्तीचा मित्र आहे. हे वाचा - अरेच्चा! तोंडातली शिकार तिथंच सोडून बिबट्याने ठोकली धूम; नेमकं असं काय घडलं? ही व्यक्ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेत (South Africa) राहणारा डीन श्नाइडर (Dean Schneider). त्याच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ आहे. सिंह हा त्याच्यासाठी पाळीव प्राणी आहे. सिंहांसोबत वेळ घालवणं त्याला खूप आवडतं. त्याच्याकडे फक्त एक नाही तर बरेच सिंह आहे. तो या सिंहांना कधीच पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवत नाही. तसंच त्यांच्यासमोर जातानाही तो कधीच सेफ्टी गिअर्सचा वापर करत नाही. हे वाचा - बापरे बाप! धावत्या कारच्या काचेवर आला साप, 2 तास तसाच केला प्रवास, VIDEO हकुना मिपाका म्हणून त्याचं 400  हेक्टर परिसरात पसरलेल्या जंगलाचा मालक आहे. इथं फक्त सिंहच नाही तर सिंहाशिवाय जिराफ, झेब्रा, बिबट्या आणि काही परदेशी पक्षीही राहतात. या जंगलात पर्यटक आणि शिकाऱ्यांना प्रवेश नाही. या जंगलासाठी डीनने फायनान्स सेक्टरची नोकरीही सोडली. जंगलाच खर्च भागवण्यासाठी त्याची आईने त्याची मदत केली. वन्य प्राण्यांच्या संरक्षणाच्या स्वप्नाला तिने नेहमीच प्रोत्साहन दिलं.
First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या