• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मुलावर भिंत कोसळत असल्याचं दिसताच ढाल बनून उभा राहिली आई अन्..; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

मुलावर भिंत कोसळत असल्याचं दिसताच ढाल बनून उभा राहिली आई अन्..; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) दिसतं, की एक महिला आपल्या लहान मुलासोबत भिंतीच्या बाजूला बसली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 23 सप्टेंबर : जगातील प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, की एखादी आई आपल्या बाळाला संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीही करू शकते. याच कारणामुळे अनेकदा आपल्या कानावर अशा बातम्या पडतात, की आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. सध्या अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद (Mother Saves Her Child's Life) झाली आहे. हा व्हिडिओ (Viral Video of Mother) पाहून पुन्हा एकदा हीच गोष्ट सिद्ध होत आहे, की आईचं मन सगळ्यात मोठं असतं. लग्नातील मस्ती पडली भलतीच महागात; मंडपातून थेट रुग्णालयात पोहोचला नवरदेव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) दिसतं, की एक महिला आपल्या लहान मुलासोबत भिंतीच्या बाजूला बसली आहे. यादरम्यान तिला जाणवतं, की काहीतरी घटना घडणार आहे. इतक्यात अचानक ही भिंत कोसळू लागते. याच्या विटा महिलेच्या अंगावर पडतात. मात्र, महिला आपल्या मुलाला धक्काही लागू देत नाही. व्हिडिओमध्ये दिसतं, की यानंतर लगेचच एक व्यक्ती इथे पोहोचतो. तो मुलाला उचलून घेतो. यानंतर महिला उठते आणि तिथून निघून जाते. हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट केला गेला आहे, याची नेमकी माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून सगळे हेच म्हणत आहेत, की एक आई आपल्या मुलांसाठी सुपरवुमनपेक्षा कमी नाही. नवरीचं वागणं पाहून सासऱ्याला हृदविकाराचा झटका; तरीही सुरू राहिलं लग्न हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांता नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं - या जगाला मातांची गरज आहे. हा व्हिडीओ शेअर होताच लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने म्हटलं की खरोखरच आईसारखा धाडसी दुसरा कोणी असू शकत नाही. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: