• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • लग्नातील मस्ती पडली भलतीच महागात; मंडपातून थेट रुग्णालयात पोहोचला नवरदेव

लग्नातील मस्ती पडली भलतीच महागात; मंडपातून थेट रुग्णालयात पोहोचला नवरदेव

फोटो क्रेडिट : द सन

फोटो क्रेडिट : द सन

नवरी आणि नवरदेव स्टेजवर असतानाच नवरदेवाचे मित्र तिथे आले आणि त्यांनी नवरदेवाला हवेत वरती फेकण्यास सुरुवात केली.

 • Share this:
  नवी दिल्ली 23 सप्टेंबर : लग्नात (Wedding) नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) यांचे मित्र-मैत्रिणी भरपूर मस्ती करताना दिसतात. त्यांच्यामुळेच लग्नमंडपाला खऱ्या अर्थाने शोभा येते. मात्र, रोमानिया (Romania) येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या मित्रांची ही मस्ती चांगलीच महागात पडली. लग्नाच्या मंडपातून हा नवरदेव थेट रुग्णालयातच (Hospital) पोहोचला. नवरदेवाच्या पाठीचा कणा मोडला असून आता बराच काळ त्याला रुग्णालयातच राहावं लागणार आहे. नवरीचं वागणं पाहून सासऱ्याला हृदविकाराचा झटका; तरीही सुरू राहिलं लग्न द सनच्या रिपोर्टनुसार, ही घटना मागील आठवड्यात उत्तर-पश्चिमी रोमानियाच्या बिहोर काऊंटीमध्ये घडली. नवरदेवाच्या मित्रांनी त्याला हवेत फेकले. मात्र, नंतर त्याला पकडू शकले नाहीत. नवरी आणि नवरदेव स्टेजवर असतानाच नवरदेवाचे मित्र तिथे आले आणि त्यांनी नवरदेवाला हवेत वरती फेकण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा तर मित्रांनी नवरदेवाला व्यवस्थित कॅच केलं. मात्र, दुसऱ्या वेळेस ते अपयशी ठरले. 31 वर्षीय नवरदेव हवेतून थेट जमिनीवर कोसळला. यानंतर आनंदाचं वातावरण एकदम दुःखात बदललं. मित्र लगेचच नवरदेवाला रुग्णालयात घेऊन गेले. इथे समजलं की त्याच्या पाठीचा कणा मोडला आहे. सध्या त्याला रुग्णालयातच राहावं लागेल. पीडित नवरदेवानं म्हटलं, की लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं. सगळे खूप आनंदात होते. इतक्यात माझे मित्र आले आणि मला हवेत फेकू लागले. ही त्यांची आनंद व्यक्त करण्याची पद्धत होती. मात्र, याच दरम्यान ही दुर्घटना घडली. ...अन् लाईव्हदरम्यान धाडकन कोसळली रिपोर्टर; कॅमेऱ्यात कैद झालं शॉकिंग दृश्य हैराण करणारी बाब म्हणजे नवरदेव रुग्णालयात पोहोचला तरीही रिसेप्शन सुरुच होतं. नवरीसोबतच दोन्ही कुटुंबातील लोक या रिसेप्शनला पूर्ण वेळ हजर राहिले. पीडित नवरदेव आता आपल्या मित्रांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. नवरदेवानं सांगितलं, की मी माझ्या वकिलांना संपर्क केला आहे. मात्र, काय करायचं आहे, हेच समजत नाहीये.
  Published by:Kiran Pharate
  First published: