मुंबई, 10 सप्टेंबर : कुत्र्यांचे (Dog) बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. ज्यात ते अगदी माणसांप्रमाणे काम करताना दिसतात. जी कामं माणसं करतात, त्यापैकी बहुतेक कामं कुत्रेही करताना दिसतात. आता तर चक्क हवेत उडणाऱ्या कुत्र्याचा (Dog flying) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Dog paragliding video).
कुत्र्याने चक्क पॅराग्लाइडिंग (Dog paragliding) केलं आहे. आपल्या मालकासोबत तो पॅराग्लायडिंग करताना दिसला (Dog paragliding with owner). उंच आकाशात बिनधास्तपणे त्याने मनसोक्त उडण्याचा आनंद लुटला (Dog paragliding with human).
View this post on Instagram
कुत्रा पॅराग्लायडिंग करत असल्याचा अवघ्या एक मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर तो बराच व्हायरल होतो आहे.
हे वाचा - झोपलेल्या चिमुकल्यांजवळ जाऊन कुत्र्याने असं काही केलं; CCTV पाहून थक्क व्हाल
व्हिडीओत पाहू शकता, एका तरुणाने आपल्या कुत्र्याला आपल्या कमरेत बांधलं आहे आणि त्याच्यासोबत तो हवेत उंच झेपावला आहे. खाली नदी, डोंगर पाहत कुत्रा छान मजा करताना दिसतो आहे. तसं तो पहिल्यांदाचा पॅराग्लायडिंग करतो आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही आहे. कारण त्याचा मालक त्याच्यासोबत आहे. त्याचा मालकावर असलेला विश्वास यातून दिसून येतो आहे.
आता माणसंच पॅराग्लायडिंग करताना किती घाबरतात. पॅराग्लायडिंग करतानाही काळजी घेणं गरजेचं आहे. अशात या कुत्र्यासोबत पॅराग्लायडिंग करणं म्हणजे कठीणच नाही का? पण त्याची आकाशात उडण्याची तयारी आधी जमिनीवरच करण्यात आली आहे.
हे वाचा - दीड लाखांच्या सर्जरीमुळे वाचलं माकड; प्राण्यावर पहिल्यांदाच झालं माणसाचं ऑपरेशन
ouka.sam इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये पॅराग्लायडिंगसाठी कुत्र्याला कसं तयार केलं, त्याला कसं प्रशिक्षण दिलं ते दाखवण्यात आलं आहे. इतक्या मेहनतीनंतर कुत्रा हवेत उडत असल्याचं हे सुंदर दृश्य आपल्याला दिसलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Viral, Viral videos