Home /News /viral /

कचऱ्याच्या वादावरून दोन महिला भिडल्या; जोरदार हाणामारीचा VIDEO VIRAL

कचऱ्याच्या वादावरून दोन महिला भिडल्या; जोरदार हाणामारीचा VIDEO VIRAL

महिला कचऱ्याच्या वादावरून एकमेकांसोबत भिडल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या हरयानवी भाषेत शिव्या देताना या महिला जोरदार हाणामारी करताना या VIDEO त दिसत आहे. यात हरयानवी भाषेचा वापर त्यात करण्यात आल्याने हरयाणातील लोकांना मनोरंजन झाले आहे

पुढे वाचा ...
    दिल्ली, 10 सप्टेंबर : तुम्ही अनेकदा पुरूषांची हाणामारी झाल्याच्या बातम्या किंवा VIDEO बघितले असतील. त्यात अनेकदा काही पुरूष मार खातात तर काही मारतात, पण आता सोशल मीडियावर (Social Media) एक हरियानवी VIDEO व्हायरल झाला आहे. त्यात काही हरियाणातील महिला कचऱ्याच्या वादावरून एकमेकांसोबत भिडल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या हरयानवी भाषेत शिव्या देताना या महिला जोरदार हाणामारी करताना या VIDEO त दिसत आहे. यात हरयानवी भाषेचा वापर त्यात करण्यात आल्याने हरयाणातील लोकांना मनोरंजन झाले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात असं वाटत आहे की या महिला फार चिडलेल्या आहेत, आणि रागाच्या भरात एकमेकांना ओरडत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची टोनींग आणि हरयानवी भाषा. त्याचा आनंद नेटकरी घेत आहेत. हरयानवी टोनींगमधील भाषा भारतात फार चवीने बोलली जाते, त्याचे फार कौतूकही केले जाते. त्याच भाषेता वापर या VIDEO मध्ये करण्यात आला आहे. या भाषेच्या आधारावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट 'तनू वेड्स मनू' बनलेला आहे. त्यामुळे कंगणा राणावतच्या त्यातील भाषाशैलीचीही लोक आठवण काढत आहेत. Haryanvi महिलांची भांडणं यूट्यूबवर VIRAL झालेल्या या व्हिडीओत हरयानवी महिला कचऱ्याच्या क्षुल्लक कारणावरून एकमेकांसोबत भिडल्या आहेत. आपल्या घराबाहेरील कचरा नेमका कुणाचा या प्रश्नावरून हा सगळा वाद झाला आहे. त्यामुळे आता सोशल मिडीयावर हा VIDEO व्हायरल झाल्यानंतर आता याला लोक मोठी पसंती देत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्या VIDEO वर विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Haryana, Live video viral, Social media

    पुढील बातम्या