Home /News /lifestyle /

वय वर्षे 35, दिसतोही धडधाकट; तरी हा लहान मुलांसारखं दररोज घालतो डायपर कारण...

वय वर्षे 35, दिसतोही धडधाकट; तरी हा लहान मुलांसारखं दररोज घालतो डायपर कारण...

35 year old man wear diaper : 35 वर्षांची ही व्यक्ती स्वतःसोबत डायपर आणि वेट वाइप्स घेऊनच फिरते.

    वॉशिंग्टन, 22 जानेवारी : सामान्यपणे लहान मुलांना डायपर घातलं जातं. वयस्कर व्यक्ती किंवा आजारी व्यक्तींसाठीही डायपर वापरलं जातं. पण तरुण आणि शरीराने धडधाकट असणाऱ्या व्यक्तीने डायपर वापरल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? (Old Man Wear Diapers)  हा तरुण जो फोटोत दिसतो आहे, तो मात्र दररोज डायपर घालतो. त्याचं वय 35 वर्षे आहे, तसं त्याच्याकडे पाहिलं तर तो आजारीही दिसत नाही म्हणजे त्याचं शरीर तर नीट आहे, तरी तो डायपर वापरतो, असं का? (Young man wear diapers) या व्यक्तीचं नाव मार्क स्पॅगनुओलो (Marc Spaganuolo) आहे. तो अमेरिकेत राहतो. या वयातही डायपर घालत असल्याने सोशल मीडियावर तो डायपर डायनॅमो (Diaper Dynamo)  म्हणून प्रसिद्ध आहे. आता डायपर घालायची त्याला हौस आहे, छंद आहे असं नाही. तर त्यामागे एक कारण आहे. जे खूप धक्कादायक आहे. मार्कचं आपल्या मलमूत्रावर नियंत्रण नाही. म्हणजे तो लघवी, शौच रोखू शकत नाही. मार्क सांगतो, जेव्हा तो 15 वर्षांचा होता तेव्हा त्याला ही समस्या सुरू झाली. सुरुवातीला तो डॉक्टरांकडे जायलाही पाहत नव्हता पण नंतर तो डॉक्टरांकडे गेला आण त्याच्या या समस्येचं निदान झालं. हे वाचा - वॉशिंग मशीन वापरताय सावधान! कपडे धुताना महिलेसोबत भयंकर दु्र्घटना; जागीच मृत्यू मार्कला पेरिफेरल न्यूरोपॅथी आहे (peripheral neuropathy). ही मेंदूच्या नर्व्हशीसंबंधीत एक समस्या आहे (Brain Nerve Condition). यामध्ये ब्लॅडर आणि बॉवेअल फूल झाल्याचे संकेत मेंदूला मिळत नाही. ज्यामुळे त्यावर नियंत्रण राहत नाही. कुठेही आणि कधीही मलमूत्र होतं. त्याची लाज वाटत असल्याने मार्कला नेहमी अडल्ड डायपर घालून राहवं लागतं. तो आता आपल्यासोबत डायपर आणि वेट वाइप्स घेऊनच फिरतो. मिररच्या रिपोर्टमुसार मार्क सुरुवातीला आपल्या या समस्येची खूप लाज वाटायची. त्यामुळे त्याने याबाबत कुणालाच काही सांगत नव्हता. हळूहळू त्याने आपल्या या समस्येला स्वीकारलं आणि तो सोशल मीडियावरही व्यक्त झाला. आपल्या या समस्येबाबत लोकांना सांगितलं आणि त्यांनाही जागरूक केलं. हे वाचा - पालकांनो Alert! फक्त एक चिप खाताच मुलं रुग्णालयात; सोशल मीडियावर खतरनाक चॅलेंज पण मार्कच्या या समस्येमुळे त्याच्यासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. त्याला आता लाइफ पार्टनर मिळत नाही आहे. त्याने डेटिंग साइट्सवर आपलं अकाऊंट बनवलं आहे आणि सर्वांना या समस्येबाबत सांगितलं आहे. त्यामुळे त्याला अशा अवस्थेतही स्वीकारणारा जोडीदार भेटत नाही आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Serious diseases

    पुढील बातम्या