मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वयाच्या 18 व्या वर्षी तरुणाने केलं 71 वर्षाच्या महिलेसोबत लग्न; आता जगतायेत असं आयुष्य

वयाच्या 18 व्या वर्षी तरुणाने केलं 71 वर्षाच्या महिलेसोबत लग्न; आता जगतायेत असं आयुष्य

गेरी आणि एलमेडा आता सोशल मीडियावरही भरपूर प्रसिद्ध झाले आहेत. इन्स्टाग्राम आणि टिकटॉकशिवाय अॅडल्ट सब्सक्रिप्शन साईट ओनलीफॅन्सवरही त्यांचं अकाऊंट असून इथे ते अॅडल्ट कंटेट पोस्ट करतात

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : असं म्हणतात की प्रेम (Love) आंधळं असतं. प्रेमात ना रंग दिसतो ना रूप आणि ना वय. एकमेकांच्या प्रेमात असलेल्या व्यक्ती शारीरिक सौंदर्यावर नाही तर समोरच्याच्या स्वभावावर त्याच्या आत्म्यावर प्रेम करतात. हीच गोष्ट आता एका कपलने पुन्हा सिद्ध केली आहे. या कपलच्या वयात 53 वर्षाचं अंतर आहे (53 Years Age Gap in Couple) . याशिवाय ज्या लोकांना असा गैरसमज होता की केवळ पैशासाठी ते एकत्र आले आहेत, त्यांनाही या कपलने प्रत्युत्तर दिलं आहे. नुकतंच त्यांनी अगदी उत्साहात आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा (Anniversary Celebration) केला.

अमेरिकेच्या टेनेसीमध्ये राहणाऱ्या 18 वर्षाच्या गेरी हार्डविक याने 71 वर्षाच्या एलमेडासोबत साल 2015 मध्ये लग्न केलं (Young Boy Married With Old Woman). दोघांची भेट एलमेडा यांच्या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी झाली. यानंतर काहीच आठवड्यात दोघांनी लग्न केलं. त्यावेळी एका ७६ वर्षाच्या महिलेसोबत गेरीचा ब्रेकअप झाला होता. जेव्हा गेरी आणि एलमेडा लग्नगाठ बांधत होते, तेव्हा लोकांनी त्यांच्यावर भरपूर टीका केली.

चविष्ट स्वयंपाक न केल्यानं पत्नी-सासूने घरजावयाची केली धुलाई; प्रकरण पोलिसात

लोकांनी दोघांना म्हटलं, की ते आजी आणि नातवाच्या वयाचे आहेत. मात्र, त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आता लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांनी अतिशय उत्साहात आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं.

गेरी आणि एलमेडा आता सोशल मीडियावरही भरपूर प्रसिद्ध झाले आहेत. इन्स्टाग्राम आणि टिकटॉकशिवाय अॅडल्ट सब्सक्रिप्शन साईट ओनलीफॅन्सवरही त्यांचं अकाऊंट असून इथे ते अॅडल्ट कंटेट (Adult Content) पोस्ट करतात. पाच दिवसाआधी गेरीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नातील फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यानं मोठा मेसेजही लिहिला आहे.

विचित्र प्रथा! कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर महिलांना कापावी लागतात बोटं

गेरीनं लिहिलं, की त्यानं आपल्या आयुष्यातील सर्वात खास निर्णय एलमेडासोबत लग्न करून घेतला. पत्नीसाठी त्यानं लिहिलं, की तू मला जगातील सर्वात भाग्यवान माणूस बनवलं. मला या गोष्टीचा अभिमान आहे की तू माझ्यासोबत आहेस आणि माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस. तू माझं आयुष्य आहेस आणि तूच माझी स्वप्नं पूर्ण केली आहेस.

First published:

Tags: Love story, Marriage, Viral news