मराठी बातम्या /बातम्या /Viral /Online Meeting दरम्यान बाथरूममध्ये आंघोळ करीत होता प्रोफेसर, कॅमेरा बंद करायला विसरला अन्...

Online Meeting दरम्यान बाथरूममध्ये आंघोळ करीत होता प्रोफेसर, कॅमेरा बंद करायला विसरला अन्...

विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार शूट केला आहे.

विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार शूट केला आहे.

विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार शूट केला आहे.

साऊथ कोरिया, 1 नोव्हेंबर : कोरोना (CoronaVirus) महासाथीदरम्यान ऑनलाइन मीटिंग (Online Meeting) आणि ऑनलाइन क्लासच्या (Online Class) सुविधांचा ट्रेंड खूप वाढला आहे. यादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना तोंड लपववावं लागलं आहे. अशीच एक घटना साऊथ कोरियातून (south korea) समोर आली आहे. येथे एका प्रोफेसरने ऑनलाइन मीटिंगमध्ये असं काही केलं की, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आणि प्रोफेसरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

ही घटना साऊथ कोरियातील हॅनयँग विद्यापीठातील आहे. 'डेली स्टार'मधील एका वृत्तामुसार, येथे एक प्रोफेसर विद्यार्थ्यांना शिकवत होते. आणि त्यांची मीटींगदेखील अटेंड करीत होते. क्लास ऑडिओ कॉलने सुरू होती. मात्र या गडबडीत चुकून प्रोफेसरचा व्हिडीओ कॉल ऑन राहिला. मात्र कॅमेरा सुरू असल्याचं प्रोफेसरला माहिती नव्हतं. यानंतर जे काही झालं याचा त्यांनी विचारही केला नसेल. (The professor was taking a bath in the bathroom during the online meeting forgot to turn off the camera)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रोफेसर अचानक आपले कपडे काढू लागतो आणि बाथरूममध्ये शिरतो. इतकच नाही तर बाथरूमचा दरवाजादेखील खुला राहिला होता. जेव्हा त्याने आंघोळ करण्यास सुरू केली, तर सर्व विद्यार्थी हैराण झाले. कारण बाथरूमच्या समोरच लॅपटॉप ठेवला होता. ज्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व स्पष्ट दिसत होतं. यानंतर विद्यार्थ्यांनी आपला लॅपटॉप बंद केला.

हे ही वाचा-Love Marriage केलं म्हणून मुलीचं शुद्धीकरण; अर्धनग्न अवस्थेत नर्मदेवर नेलं आणि..

यातील काही विद्यार्थ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. बराच वेळ प्रोफेसरला कॅमेरा सुरू असल्याचं कळालच नाही. आंघोळ केल्यानंतर ते बाथरूममधून बाहेर पडलं आणि त्यांनी शिकवण्यासदेखील सुरूवात केली. त्यावेळी एका विद्यार्थ्याने सांगितलं की, तुमचा कॅमेरा सुरू राहिला होता. यानंतर प्रोफेसरला धक्काच बसला. प्रोफेसरला सर्व विद्यार्थ्यांना माफीचा एक मेलदेखील पाठवला.

ही घटना व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने त्यांच्याकडे उत्तर मागितलं आहे. दुसरीकडे विद्यापीठाकडून चौकशी समितीचे गठण करण्यात आले असून या प्रकरणात तपास सुरू आहे. सांगितलं जात आहे की, प्रोफेसरला नोकरीवरुन काढलं ही जाऊ शकतं.

First published:

Tags: Online education, South korea