मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तरुणानं अल्पवयीन प्रेयसीला चाकूनं भोसकलं, हत्येनंतर FB वर व्हिडिओ शेअर करत सांगतिलं धक्कादायक कारण

तरुणानं अल्पवयीन प्रेयसीला चाकूनं भोसकलं, हत्येनंतर FB वर व्हिडिओ शेअर करत सांगतिलं धक्कादायक कारण

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तरुणानं चाकूनं भोसकून हत्या (Girl Murdered by Lover)केली आहे. युवक एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं हत्येनंतर रात्री साडेबारा वाजता फेसबुकवर एक व्हिडिओही (Facebook Video) पोस्ट केला.

  • Published by:  Kiran Pharate

जयपूर 04 जुलै : प्रेमात (Love) अनेकदा लोक टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. कधी स्वतःचा तर कधी समोरच्याचा जीव घ्यायलाही अनेकजण तयार असतात. अशीच आणखी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तरुणानं चाकूनं भोसकून हत्या (Girl Murdered by Lover) केली आहे. युवक एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं हत्येनंतर रात्री साडेबारा वाजता फेसबुकवर एक व्हिडिओही (Facebook Video) पोस्ट केला. व्हिडिओमध्ये त्यानं सांगितलं, की तो प्रेमात वेडा झाला होता आणि दोघांचीही अपयशी ठरणारी लव्ह स्टोरी (Love Story) त्याला अमर करायची होती. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) नागौर जिल्ह्यातील गुढ़ा भगवानदास येथील आहे.

पुण्यात MPSCची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची थक्क करणारी सुसाईड नोट

या घटनेच्या वेळी संबंधित तरुणी शौचालयाला निघाली होती. चाकू लागल्यानंतर लिछमानं आपल्या घराकडे धाव घेतली. कुटुंबीयांनी तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रात्री उशिरा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर आरोपी विनोद वाल्मिकी फरार झाला. लिछमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

लग्नमंडपात अचानक पोलिसांची एन्ट्री; नवरदेव-नवरीला विचारला एक सवाल आणि मोडलं लग्न

या हत्येनंतर आरोपी विनोदनं रात्री सुमारे साडेबाराच्या दरम्यान फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत त्यानं सांगितलं, की गुढ़ा भगवानदासमध्ये त्यानं एक चाकू हल्ला केला आहे. त्यानं आपण प्रेमात वेडे झालो असल्याचं सांगितलं, तसंच या हल्ल्यावेळी आपल्यावरही चाकूचे चार वार झाले असून आपणही जखमी असल्याचं त्यानं म्हटलं. मुलीलाही चाकूचे चार वार लागले आहेत. या घटनेत मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचं घेणं-देणं नाही, असं त्यानं म्हटलं. पुढे तो म्हणाला , की 'त्याला ही मुलगी भेटणं अशक्य होत होतं. यामुळे दोघांनी मिळून हे कृत्य केलं. आता मुलीचा जीव वाचला नाही तर मीदेखील आत्महत्या करेल. आम्ही दोघांनी आमचं प्रेम अमर करण्यासाठी हे सर्व केलं आहे.'

First published:

Tags: Crime news, Love story, Murder news