मेक्सिको सिटी, 18 जुलै : प्रत्येक पालकांसाठी आपल्या मुलांचा वाढदिवस खास असतो. मुलांचा बर्थडे खास पद्धतीने साजरा करण्याचीही काही पालकांची हौस असते. त्यासाठी ते काहीतरी हटके आयडियाही शोधून काढतात. अशीच एक महिला जिने आपल्या मुलाचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. तिचा मुलगा अठरा वर्षांचा झाला. पण तिने असं काही केलं की त्यामुळे नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. अठरावं वर्ष म्हणजे मुलं तारुण्यात पदार्पण करतात. या वयात पालकांनी आपल्या मुलांशी मैत्री करायची असते, असं म्हणतात. पण तरी पालक आणि मुलांमधील एक मर्यादाही कायम ठेवायला हवी. भारतात हे दिसून येतं. पण परदेशात मात्र तसं नाही. अशाच परदेशातील मायलेकाचा हा व्हिडीओ. जो पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एका आईने आपला मुलाला 18 वर्षांचा होताच असं काही केलं, की ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
मेक्सिकोतील न्यूवो लिओन इथं राहणाऱ्या या मायलेकाचा बर्थडे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बापरे! रात्री आपोआप उघडायचा गेट, घराबाहेर भीतीदायक खुणा; सत्य समजताच हादरली महिला या व्हिडिओमध्ये एक आई तिच्या हातात मुलाच्या वाढदिवसाचा केक धरून त्याला सरप्राईझ द्यायला जाते आहे. मुलगा बाहेरच्या खोलीत बसला आहे. तिथे त्याला ओळखणारे बरेच लोकही आहेत. आई त्याच्या केकवर 18 नंबरची मेणबत्ती लावते आणि नंतर त्याचे डोळे बंद करते. त्याचे डोळे उघडताच एक स्ट्रीपर बोल्ड ड्रेसमध्ये त्याच्यासमोर चालत येते. तिला पाहून मुलगालाही लाज वाटते, तो तोंड लपवू लागतो. यानंतर आई हसत हसत निघून जाते आणि स्ट्रीपर मुलाच्या मांडीवर बसून अश्लील डान्स करू लागतात. आईने आपल्या मुलाच्या बर्थडेला स्ट्रिपर्स बोलावल्याचा दावा केला जात आहे. डेली स्टारच्या वृत्ता नुसार, अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. काहींना ही अशी आई आवडली आहे. तर काहींनी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आईने प्रतिष्ठा राखली पाहिजे होती, असं म्हटलं आहे. Viral News: ते सत्य समजताच हादरली महिला; शेकडो मुलांचा बाप होता तिचा पती, शेवटी… तुम्हाला मुलासाठी आईने दिलेलं हे असं गिफ्ट, यावर तुमची प्रतिक्रिया काय, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.