जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News: ते सत्य समजताच हादरली महिला; शेकडो मुलांचा बाप होता तिचा पती, शेवटी...

Viral News: ते सत्य समजताच हादरली महिला; शेकडो मुलांचा बाप होता तिचा पती, शेवटी...

पतीचं धक्कादायक सत्य समजलं

पतीचं धक्कादायक सत्य समजलं

त्याने सांगितलं, की तो त्याच्या भूतकाळात अशा काही गोष्टी करत होता, ज्या त्यावेळी त्याला योग्य वाटत होत्या. लग्नानंतर त्याने हा सगळ्या गोष्टींपासून दुरावण्याचा प्रयत्न केला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 18 जुलै : असं म्हणतात की पती पत्नीच्या चांगल्या नात्यासाठी दोन व्यक्तींमध्ये पारदर्शकता असणं खूप गरजेचं असतं. नातं जितके पारदर्शक असेल तितकं ते जास्त काळ टिकेल. मात्र, कधी परिस्थितीमुळे तर कधी इतर काही कारणांमुळे माणसांमध्ये दुरावा निर्माण होतो. जर ही परिस्थिती पती-पत्नीमध्ये आली तर प्रकरण आणखीच गंभीर बनतं. असाच काहीसा प्रकार एका पुरुषासोबत घडला, ज्याच्या पत्नीला त्याचा भूतकाळ समजल्यावर तिला धक्का बसला. या व्यक्तीने Reddit वर आपली कहाणी शेअर केली आहे. त्याने सांगितलं, की तो त्याच्या भूतकाळात अशा काही गोष्टी करत होता, ज्या त्यावेळी त्याला योग्य वाटत होत्या. लग्नानंतर त्याने हा सगळ्या गोष्टींपासून दुरावण्याचा प्रयत्न केला, पण एके दिवशी त्याचं सत्य त्याच्या पत्नीसमोर आलं. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात आलेला भूकंप इतर कोणीही समजू शकत नाही. Crime News: 3 महिन्यांतच मोडली सुखी संसाराची स्वप्नं; प्रेमविवाहानंतर 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या या व्यक्तीने स्वतःबद्दल लिहिलं आहे की, त्याने कॉलेजच्या दिवसांमध्ये पैसे मिळवण्यासाठी स्पर्म डोनेशनचा मार्ग स्वीकारला होता. आई-वडील होऊ न शकलेल्या जोडप्यांना तो मदत करत असे आणि त्याला पैसेही मिळत असे. जेव्हा तो त्याच्या प्रेयसीला (आताच्या पत्नीला) भेटला तेव्हा त्याने हे सगळं काम सोडून दिलं. आता त्यांच्या लग्नाला 6 वर्षे झाली असून त्यांना 2 मुलं आहेत. त्यानी हे काम थांबवलं होतं. मात्र काही वर्षांपूर्वी त्याला पैशांची गरज भासल्याने त्यानी पुन्हा एकदा स्पर्म डोनेशनचा मार्ग स्वीकारला. मात्र हे थोडेच दिवस चाललं आणि आता तो हे सगळं विसरलाही होता. पती-पत्नी मित्रमैत्रिणींसोबत बसलेले असताना ही बाब समोर आली. अशा स्थितीत त्या व्यक्तीने पत्नीला कॉलेजमध्ये केलेल्या स्पर्म डोनेशनबाबत सांगितलं. हे सत्य त्याच्या पत्नीला समजताच तिला राग आला. घरी आल्यानंतर यावरून जोरदार वादावादी झाली. त्या व्यक्तीला यात काही चुकीचं काही वाटत नव्हतं, पण पत्नी ही फसवणूक असल्याचं बोलत होती. त्या व्यक्तीच्या या पोस्टवर काही लोकांनी त्याला योग्य तर काहींनी चुकीचं मानलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात