कॅनबेरा, 18 जुलै : बऱ्याचदा अशा काही घटना घडतात ज्या कल्पनेच्या पलिकडे असतात. हे नेमकं काय होतं, आहे ते समजत नाही. मग ही भुताटकी वगैरे तर नाही ना, अशी भीती वाटू लागते. असंच भयानक घडलं ते एका महिलेसोबत. जिच्या घरासमोरील गेट रात्री आपोआप उघडायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पाहायची तेव्हा घराबाहेर रहस्यमयी भीतीदायक अशा खुणा असायचा. यामागील सत्य तिला एक दिवस समजलं आणि ती हादरली. ऑस्ट्रेलियातील ही घटना आहे. महिलेने आपला हा भयावह अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका फेसबुक ग्रुपवर तिने पोस्ट केली आहे. ज्यात तिने आपल्या घराबाहेरील काही फोटो शेअर केले आहेत. तसंच नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. या खुणा नेमक्या कसल्या आहेत, असंही तिने युझर्सना विचारलं आहे.
जिलॉंगमध्ये राहणाऱ्या महिलेने सांगितल्यानसार तिच्या घरासमोर एक गेट आहे, जो रात्री आपोआप उघडतो. घराबाहेर पोस्ट बॉक्स आणि गेटवर रहस्यमयी अशा लाल खुणा आहेत. लाल रंगाच्या उभ्या रेषा. सर्वात आधी ही खूण पोस्ट बॉक्सवर होती. यानंतर आठवडाभराने तिला घराच्या गेटवर अशा रेषा दिसल्या. ज्यामुळे ती घाबरली आहे. हे चिन्ह कोणत्या भुताचं तर नाही ना, अशी भीती तिने व्यक्त केली आहे. महिलेचा विचित्र आजार चिमुकल्यांसाठी ठरला ‘संजीवनी’; हजारो बाळांचा वाचला जीव हे चिन्ह नेमकं काय, कसलं आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून तिने सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करत युझर्सना विचारणा केली. अनेक युझर्स तिच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी तिला हे चिन्हं कसलं आहे, ते सांगितलं. डेली स्टार न्यूजच्या वृत्तानुसार लोकांनी महिलेला सांगितलं की, ही खूण गुन्हेगारांनी केली आहे. हा एक प्रकारचा कोड आहे जो गुन्हेगारांनी त्यांच्या साथीदारांना सूचित करण्यासाठी बनवला असावा. हे असे गुन्हेगार असतील जे इतरांच्या कुत्र्यांना लढण्यासाठी त्यांना चोरतात. एकाने सांगितले की, गुन्हेगार हे बेकायदेशीर लढाई आयोजित करण्यासाठी कुत्रे चोरतात आणि नंतर त्यांना एकमेकांशी लढवतात, हेदेखील त्यानं पाहिले आहे. काहींनी घर लुटणारेही असू शकतात असं म्हटलं आहे. Viral News: ते सत्य समजताच हादरली महिला; शेकडो मुलांचा बाप होता तिचा पती, शेवटी… एका युझरने तिला घराला कुलूप लावा, ती खूण पुसून टाका आणि कुत्र्यांना आत ठेवा, असा सल्ला दिला आहे.